Aurangabad News: शेतात रासायनिक खतांची मात्रा जास्त प्रमाणात होत असल्याने दिवसागणिक कॅन्सरचे रुग्ण (Cancer Patients) वाढत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी (Farmers) सेंद्रिय शेतीचा अवलंब करून किफायतशीर शेतीसाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. तसेच शेतीपूरक व्यवसाय करीत शेतातील माल शेतकऱ्यांनीच विकला पाहिजे असे असा मोलाचा सल्ला इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. सिल्लोड येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या (State Agricultural Festival) निमित्ताने आयोजित कीर्तनात ते बोलत होते.

सिल्लोड महोत्सव 2023 अंतर्गत सिल्लोड येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे समाजप्रबोधनपर जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रबोधन करीत असताना निवृत्ती महाराज बोलत होते. दरम्यान शेतात रासायनिक खतांची मात्रा जास्त प्रमाणात होत असल्याने दिवसागणिक कॅन्सरचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून किफायतशीर शेतीसाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करावा असा मोलाचा सल्ला यावेळी इंदोरीकर महाराज यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. या कीर्तन सोहळ्यास राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, सिल्लोड महोत्सवाला राज्यस्तरीय कृषी महोत्सवाची जोड देण्यात आली आहे. आपल्या देशात 70 टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करणे ही काळाची गरज असून शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील यावेळी इंदोरीकर महाराज यांनी केले.

लग्नावर होणारा नाहक खर्च टाळावा

live reels News Reels

तर ईश्वराने दिलेल्या मानव जन्माचे सार्थक करण्यासाठी संतांच्या विचारांचे आचरण करा, शेतकऱ्यांनी लग्नावर होणारा नाहक खर्च टाळावा, एक व्यक्ती एक झाड संकल्पना राबवा. गावपातळीवरील लोक प्रतिनिधींनी ग्रामीण भागातील शिक्षण व आरोग्याच्या दृष्टीने नवनवीन प्रयोग राबवावा. संकटात सापडलेल्या इतरांना नेहमी मदत करावी. समाजकार्य, समाज उन्नतीसाठी कायम योगदान द्या, रागावर नियंत्रण ठेवून संयमी जगणे शिका, आयुष्य हसत खेळत जगा आणि वैद्यकीय दृष्ट्या ज्यांना रक्तदान करणे शक्य आहे त्यांनी रक्तदान करावे असा उपदेश निवृत्ती महाराज यांनी कीर्तनातून यावेळी दिला.

यामुळे महोत्सवाची चर्चा…

सिल्लोड येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर अनेक महत्वाच्या राजकीय नेत्यांनी या महोत्सवाला आत्तापर्यंत भेट दिली आहे. मात्र या महोत्सवासाठी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना पैसे वसूल करण्याचे काम देण्यात आल्याचा आरोप झाला होता. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील हा मुद्दा अधिवेशनामध्ये सभागृहात मांडला होता. त्यामुळे या महोत्सवाची मोठी चर्चा झाली होती. तर विरोधकांनी याच मुद्द्यावरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here