Job Vacancy In Pune :  पुण्यातील आणि पुण्याबाहेरील (job) सगळ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरु शकते. सध्या अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात मात्र त्यासंदर्भातील माहिती प्रत्येकापर्यंत नीट (pune) पोहोचू शकत नाही. त्यामुळे पुण्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ चं आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 11 जानेवारीला या (Placement Drive) प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येणार आहे.

नोकरीइच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने यापुढे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम राबवली जाणार आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करुन, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. याचाच एक पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी या कार्यालयामध्येच प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

थेट मुलाखती आणि नोकरीची संधी

विविध पदांकरता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांची तात्काळ नोकरभरती आवश्यक आहे अशा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या कार्यालयात उमेदवारांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्याकरता पाचारण करण्यात येणार आहे. या मुलाखतींना प्रत्यक्ष हजर राहून पात्र होतील अशा उमेदवारांना लगेच जागेवरच नोकरीची संधी मिळणार आहे.  

कशी कराल नोंदणी?

  • पुणे जिल्ह्यातील नोकरी हव्या असलेल्या युवक-युवतींनी या संधीचा लाभ आणि अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • नोंदणी नसल्यास प्रथम आपली नावनोंदणी करावी आणि होमपेजवरील नोकरीसाधक (जॉब सीकर) लॉगीनमधून आपापल्या युझर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे.
  • उमेदवारांनी लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डमधील ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या बटणावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग आणि नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील फर्स्ट प्लेसमेंट ड्राइव्ह-पुणे’ या रोजगार मेळाव्याची निवड करावी.
  • उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करत असल्याची खात्री करुन उचित असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवावा. 

कुठे होणार प्लेसमेंट ड्राईव्ह?

ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवार ११ जानेवारी रोजी समक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे-11 येथे आपल्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे. 

live reels News Reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here