Chandrakant Patil on Exam: राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयाच्या परीक्षा, निकाल आणि शैक्षणिक वेळापत्रक याचे नियोजन करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. सर्व परीक्षा 31 मे पर्यंत तर निकाल 30 जूनपर्यंत आणि नवीन  शैक्षणिक वर्ष एक ऑगस्ट पासून सुरू करण्याचे नियोजन करा, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 

आज राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राज्यातील सर्व विद्यापीठे महाविद्यालयांच्या परीक्षा निकाल आणि शैक्षणिक वेळापत्रक याची नियोजन योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या आहेत.   
त्यासोबत सीईटी प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शैक्षणिक वर्ष वेळेत  सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विद्यापीठांनी नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत

परीक्षा निकाल आणि नव्या शैक्षणिक वर्षाची नियोजन नेमके कसे असावे ? 

live reels News Reels

राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा 31 मे पर्यंत पूर्ण होतील याचे नियोजन करून 30  जून पर्यंत निकाल जाहीर करावेत.

जून-जुलैमध्ये सीईटी परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून एक ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी वेळापत्रकाचे नियोजन करावे.

 विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करावे.त्यामुळे विद्यार्थ्यांना  राज्याबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या उच्च व तंत्र शिक्षणाच्या संधी अधिक उपलब्ध होण्यास मदत होईल आणि  विद्यार्थ्यांचा मानसिक त्रासही कमी होईल, अशा प्रकारचे नियोजन केले जावे, असे मार्गदर्शन आजच्या बैठकीत करण्यात आले

विद्यापीठ महाविद्यालया नॅक मूल्यांकन करणे गरजेचे-
ज्या विद्यापीठ, महाविद्यालयांचा नॅक मूल्यांकन होऊन पाच वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. नॅक मूल्यांकन प्रक्रिया केली गेली नाही, अशा महाविद्यालयांचा प्रथम वर्ष प्रवेश बंद करण्यात येतील. व्यवसायिक अभ्यासक्रमाची पुस्तके आणि साहित्य मराठीत उपलब्ध करण्यासाठी ‘उडाण’ प्रकल्पाबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि मुंबई आयआयटीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. 

आणखी  वाचा:

Job Majha : महावितरण आणि  परभणी महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here