मुंबई:   नाशिकमध्ये (Nashik News) शिंदे गटाकडून ठाकरे गटाला नवीन भगदाड  पडले आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. सकाळी 9 वाजता मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत होणार प्रवेश होणार आहे. तर परभणीत महाविकासआघाडीतील 30 नगरसेवक शिंदे गटात जाणार आहे. ठाकरे गट आणि महविकासआघाडीला हा मोठा धक्का मानला जातो.  

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे  यामध्ये  विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, यासह विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

संजय राऊत आज दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत.या आधीही राऊतांची पाठ फिरताच 12 माजी नगरसेविकांनी शिंदें गटात प्रवेश केला होता. डॅमेज कंट्रोलसाठी उध्दव ठाकरे यांची जानेवारी अखेर सभा होणार मात्र त्या आधीच पक्षाला पुन्हा गळती लागली आहे. 

परभणीत महाविकासआघाडीतील 30 नगरसेवक शिंदे गटात 

तर परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. 

live reels News Reels

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करताना सध्या अनेक लोक येऊन पक्षाला जोडली जात आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवक आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. राज्यातील सरकार सत्तेत आल्यापासून कष्टकरी, शेतकरी कामगार आशा सर्वच घटकातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  परभणी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करू असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. 

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार शिवाजीराव जाधव,शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here