बीकेसीतील कोव्हिड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एमएमआरडीएनं या रुग्णालयाच्या बांधकामासाठी ५९, २७ कोटींचे बिल महानगरपालिकेला दिलं आहे आणि हे पालिकेच्या नियमांविरुद्ध असल्याचा आरोप, भाजप नेता विनोद मिश्रा यांनी केला आहे.
एमएमआरडीएनं बाजारभावापेक्षा दुप्पट ते तिप्पट रक्कम जास्त आकारली आहे. तसंच, एमएमआरडीए पालिकेच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मिश्रा यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना एक सविस्तर पत्र लिहलं आहे.
याप्रकरणी विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास करण्याची विनंती करणार असून राज्यापालांकडेही तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महापालिकेचे विरोधी नेता रवि राजा, बीजेपी नेता प्रभाकर शिंदे, राकांपाचे नेते राखी जाधव, सपा नेता रईस शेख यांनाही या पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे.
बैठक घेण्याची मागणी
बीजेपीचे गट नेता प्रभाकर शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जुलै अखेरीस सभा घेण्यासंबंधी पत्र लिहलं आहे. करोना संकटाच्या काळात एप्रिल ते जुन महिन्यात पालिकेची एकही बैठक घेण्यात आली नाहीये. यामुळं २९, ३० आणि ३१जुलैचा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, ही बैठक रद्द करण्यात येईल अशी शक्यता शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ही सभा कोणत्याही परिस्थितीत घेण्यात यावी असं निवेदन त्यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times