Ahriculture News : शेतकऱ्यांच्या (Farmers) समृद्धीसाठी आधुनिक  विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचे मत भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या कोलकाता येथील केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. बसंत कुमार दास (Dr. Basant Kumar Das Director Central Fisheries Research Institute) यांनी व्यक्त केले. देश धान्य उत्पादनात खुप पुढे गेला आहे. यामागं शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांची (Farmers) आर्थिक स्थिती फार सुधारली नसल्याचे दास यावेळी म्हणाले. 

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या निमित्त शेतकरी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. दास बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना होत्या. पद्मश्री राहीबाई पोपेरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.सुभाष चौधरी, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.आशिष पातुरकर यावेळी उपस्थित होते.

निसर्गातील बदलाचा शेतकऱ्यांना फटका

आजही शेतकऱ्यांची स्थिती नाजूक आहे. मेहनती इतके उत्पन्न मिळत नाही. निसर्गातील बदलाचा देखील फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, यासाठी यंदा पहिल्यांदाच शेतकरी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले असल्याचे भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना म्हणाल्या. देश, विदेशातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन करतील आणि त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल असेही त्या म्हणाल्या. अकोला येथील कृषी विद्यापिठाने आतापर्यंत 176 विविध पिकांचे वाण विकसित केल्याची माहिती डॉ. प्रकाश कडू यांनी दिली. विदर्भातील 11 हजारावर गावांपर्यत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यात आले आहे. जैविक शेतीसाठी विद्यापीठ नियमित काम करीत असल्याचेही डॉ.कडू यांनी सांगितले.

प्रत्येकाच्या शेतात देशी बियाणे वापरले गेले पाहिजेत : राहीबाई पोपेरे

शेतकरी विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून बीजमाता म्हणून देशभर ओळख असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे उपस्थित होत्या. सुरुवातीच्या काळात माझ्या कामावर टिका व्हायची, लोक हसायचे. आज 3 हजार 500 महिलांना सोबत घेऊन 200 गावांमध्ये काम सुरु केल्याचे राहीबाई पोपेरे यांनी सांगितले. देशी बियाणांचा वापर आणि त्यापासून मिळणारे उत्पादन वाढले पाहिजे. विविध पिकांच्या देशी बियाणांच्या संवर्धनासह त्याचा प्रचार प्रसार आम्ही करतो आहे. प्रत्येकाच्या शेतात देशी बियाणे वापरले गेले पाहिजे. गावात विषमुक्त भाजीपाला विकला गेला पाहिजे, तरच पुढची युवापिढी सशक्त होईल असेही पोपेरे म्हणाल्या. रासायनिक खते, औषधांच्या वापरामुळं रानभाज्या नष्ट झाल्या आहेत. भविष्यात माती देखील नष्ट होईल, असे त्या म्हणाल्या.

live reels News Reels

महत्त्वाच्या बातम्या:

Indian Science Congress : रासायनिक खतं, औषधांच्या वापरामुळे रानभाज्या नष्ट झाल्या, भविष्यात मातीही नष्ट होईल; राहीबाई पोपेरेंचा इशारा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here