अहमदनगर: ‘नगरमधील रुग्णवाढीचा वेग अंगावर शहारे आणणारा आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात व शहरामध्ये पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याची गरज आहे. दुसरा पर्याय नाही,’ अशी मागणी करणारे पत्र खासदार डॉ.सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना लिहिले आहे.

वाचा:

नगर जिल्ह्यात करोना संसर्गाचा वेग प्रचंड आहे. रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होत आहे. त्यामुळं जिल्ह्यात लॉकडाऊन करणेबाबत वेगवेगळी मते पुढे येऊ लागलेली आहेत. खासदार विखे यांनीही जिल्हाधिकारी द्विवेदी यांना नगर शहर व जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत पत्र दिले आहे.

वाचा:

नगर शहर व जिल्ह्यात करोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, अहोरात्र राबत आहे. मात्र करोना बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर करोना संशयितांची टेस्टिंग आणि ट्रेकिंग या दोन खात्रीशीर उपाययोजना आपल्या पुढे आहेत. एकीकडे करोना रुग्णांची वाढती संख्या आणि सध्या असलेल्या सुविधांवर पडणारा ताण या कोंडीत आपण सर्व जण सापडलो आहोत. एक महिन्यापूर्वी नगरमध्ये करोना प्रसाराचा वेग प्रतिदिवस एक रुग्ण असा होता. तो आता दिवसाला दोनशे रुग्ण असा झाला आहे. रुग्ण वाढीचा हा वेग अंगावर शहारे आणणारा आहे. त्याच वेळी जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या, पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपर्यंत पोहोचण्यात येत असलेले अपयश, या सगळ्यांचा परिपाक साथीच्या आजाराच्या स्फोटात होण्याची दाट शक्यता आहे. एक खासदार म्हणून नव्हे तर एक डॉक्टर म्हणून या सर्व गोष्टीकडे बघत असताना करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी जनता कर्फ्यू लागू करणे हाच पर्याय मला सध्या दिसतो आहे. त्यामुळं नगर शहरात व ज्या तालुक्यांमध्ये जिथं रुग्ण वाढीचा आकडा तीन अंकी आहे, अशा ठिकाणी पाच दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात यावा, अशी सूचना विखे यांनी पत्राद्वारे केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here