डोंबिवली पूर्वेकडील सागर्ली परिसरात ४ जानेवारीला सुमारास एका तरुणीची अज्ञात इसमाने छेड काढली. या तरुणीने ही बाब आपल्या कुटुंबाला सांगितली. बहिणीची छेड काढल्यामुळे संतापलेला भाऊ पवन पाटील यान सागर्ली परिसरात या तरुणाचा शोध सुरु केला. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल भालेकर हा तरुण सागर्ली परिसरातून जात होता. याच दरम्यान पवन पाटील याने त्याला गाठले. बहिणीने केलेल्या वर्णनावरुन त्याला संशय आल्याने काहीच विचारपूस न करता त्याने थेट विठ्ठल याला बेदम मारहाण केली. विठ्ठल पवनला का मारहाण करतोयस याबाबत विचारत होता. मात्र, पवनने काही ऐकता विठ्ठलला मारहाण सुरूच ठेवली. इतकंच नव्हे तर संतापाच्या भरात पवन पाटीलने आपल्या जवळील चाकू काढून विठ्ठलवर हाताला गंभीर दुखापत झाली. विठ्ठलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
‘बीजमाता’ राहीबाई पोपेरेंचं भाषण अर्ध्यावर थांबवलं, मोदींवरील टीकेनंतर आयोजकांची सूचना
पण आपण ज्या तरुणाला मारत आहोत तो छेड काढणारा तरुण नसल्याचं कळताच पवन पाटील चपापला. त्याने तिथून पळ काढला. तरुणाला मारहाण होत असल्याची माहिती मिळताच टिळक नगरच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार टिके यांनी विठ्ठल भालेकरला उपचारासाठी रुग्णलयात दाखल केलं. या प्रकरणी विठ्ठल भालेकरच्या तक्रारीवरुन टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा सुरु करण्यात आली.