Dhule Crime Today : राज्यात गुन्ह्यांच्या घटना वारंवार वाढत असताना धुळ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे अवघ्या २० वर्षीय तरुणाकडे असं काही सापडलं की यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

धुळे शहरातील जुनी पांझरा चौपाटी येथे देवपूर पोलिसांनी हा लाखो रुपयांचा गांजा जप्त केला असून सूर्यकांत दिलीप तमायचेकर वय २० वर्षया तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथून या तरुणांनी हा गांजा आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबतची गोपनीय माहिती देवपूर पोलिसांना मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून सदर तरुणाला अटक केली आहे. हा गांजा या २० वर्षीय तरुणाने नेमका कुठून आणला व कुठे नेला जात होता याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.