: संसर्गाची भीती असली तरी सिंधुदुर्ग व जिल्ह्यात हजारो चाकरमानी गणेशोत्सवाला येणार आहेत. या चाकरमान्यांच्या डोकेदुखीत आणखी भर पडणार असून पंचक्रोशी व राजापूर तालुक्यातील अशा एकूण २५ ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आज सरकार वा जिल्हा प्रशासनाची वाट न पाहता काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ( )

वाचा:

अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे चाकरमान्यांमध्ये कोणत्याही प्रकारे संभ्रम राहू नये म्हणून ग्रामपंचायतींची भूमिका स्पष्ट करण्याच्या हेतुने खारेपाटण येथे आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या खारेपाटण पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.

गणेशोत्सवाला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी बस सोडण्याचा विचार शासन करत आहे. नियम आणि अटींसह या गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात येणार हे स्पष्ट झाले आहे. या अनुशंगाने आजच्या बैठकीत चर्चा झाली. या चर्चेअंती गावात येणाऱ्या प्रत्येकाला १४ दिवस क्वारंटाइन रहावंच लागेल, असा ठराव एकमताने करण्यात आला. या भागात खारेपाटण ही मध्यवर्ती बाजारपेठ असून १४ दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतरच या बाजारपेठेत प्रवेश दिला जाईल, असाही ठराव करण्यात आला.

वाचा:

दरम्यान, कामानिमित्त बाहेरगावी असलेला कोकणी माणूस दरवर्षी न चुकता कुटुंबकबिल्यासह गणेशोत्सवासाठी आपल्या कोकणातील मूळगावी दाखल होतो. यंदा मात्र करोनामुळे या सर्वांच्याच पुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवासासाठी ई-पास, मेडिकल सर्टिफिकेट, गावी गेल्यावर १४ दिवस होम क्वारंटाइन, अशी अनेक विघ्ने आडवी आली आहेत. याबाबत शासनस्तरावर अनेक बैठका झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आवश्यक सूचना दिल्या असल्या तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. कोकणात जाणाऱ्या चाकमान्यांची आधी करोना चाचणी होणार का, ई-पासची अट रद्द होणार का, एसटी बस सोडल्या जाणार का, विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार का, क्वारंटाइन किती दिवसांचे असणार, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. असे असताना आता ग्रामपंचायतींनी क्वारंटाइनबाबत ठाम भूमिका घेतल्याने येत्या काळात मोठं वादळ उठण्याची चिन्हे आहेत.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here