नवी दिल्ली : या वर्षी २०२३ मध्ये सोन्याचा भाव ६०,००० रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अनेकांनी याबाबत अंदाज बांधला आहे. त्यामुळे सोन्याचे भाव (Gold Price)वाढण्यामागे कोणती कारणे आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. कॉमेक्स मार्केटमध्ये (Comex Market) गोल्ड फ्यूचर प्रति औंस $१८५२ पर्यंत खाली आले आहे आणि सोन्याच्या स्पॉटची किंमत प्रति औंस $१८४७ पर्यंत खाली आली आहे.

२ वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं सोनं…

४ जानेवारी २०२३ रोजी सलग तिसर्‍या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्या सोन्याचे भाव दोन वर्षांच्या उच्चांकावर आहेत. तर चांदीचा भावही ७० हजारांच्या वर आहे. अशात आता सोनं ६० हजार रुपये पार करण्याच्या तयारीत आहे. पण याची नेमकी कारणं काय? जाणून घेऊयात.

भारतात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ८१ रुपयांवरून पुन्हा ८३ रुपयांवर पोहोचला आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होताना पाहायला मिळतो. अशात सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे फेड पॉलिसी रेट (Fed Policy Rate) . यूएस फेड रिझर्व्हचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षी २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये पॉलिसी रेटमध्ये (Policy Rate) वाढ झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीला मोठा आधार मिळाला आहे.

भारतात जन्मलेले अमेरिकन CEO सत्या नडेला यांना मिळतो घवघवीत पगार; जाणून घ्या त्यांच्याविषयी सर्वकाही
हीच घसरण डॉलर निर्देशांकात दिसून येत आहे, जी गेल्या वर्षाच्या शेवटच्या दिवसांत १०५ च्या पुढे जात होती. ती आता १०४ वर व्यापार करत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याची किंवा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित ठिकाणाकडे वळले असून मागणी जास्त असल्याने सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे.

जगभरातील सेंट्रल बँकांकडून सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे. हे देखील सोन्याच्या दरात वाढ होण्याचं महत्त्वाचं कारण आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतात लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे बाजारात सोन्याची मागणी वाढत आहे. भारतातील देशांतर्गत मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे.

चीनमध्ये कोविडचा कहर पुन्हा सुरू झाला असला तरी चीनमध्ये नवीन वर्षाचा सण सुरू झाला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढू लागली आहे. हाच चीन जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार देश आहे आणि अर्थव्यवस्था सुरू झाल्यानंतर मागणी आणखी वाढू लागली आहे.

गुंतवणूकदार कंगाल! अनिल अंबानींच्या RComने दिला मोठा धक्का; ७९२ चा शेअर २ रुपयावर आपटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here