Nashik News : नाशिकमध्ये लवकरच डॉ. अमोल कोल्हे अभिनित शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा थरार अनुभवता येणार आहे. जानेवारीत शेवटच्या आठवड्यात सहा दिवस हे अजरामर महानाट्य नाशिकमध्ये रंगणार आहे. महाराष्ट्रात गाजत असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन प्रथमच नाशिक शहरात होत आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले व शिवपुत्र संभाजी महाराजांचा ज्वाजल्य इतिहास अनुभवण्यासाठी नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. असे महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित शिवपुत्र संभाजी हे महानाट्य लवकरच नाशिकमध्ये होणार असून याची तयारी सुरु झाली आहे. या महानाट्यात डॉ. अमोल कोल्हे संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. 18 एकर परिसरात तीन मजली सेट, घोडे ताफा आणि जवळपास 200 कलाकारांचा संचासह हे महानाट्य सादर होणार आहे. दिनांक 21 ते 26 जानेवारी या कालावधीत रोज सायंकाळी सहा वाजता नाशिक तपोवन येथील मोदी मैदान येथे महानाट्य सादर होणार आहे. डोळे दीपवणाऱ्या महानाट्याबरोबरच या मैदानात शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. 

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग नाशिकमध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार असून त्यासाठी तीन मजली सेट घोडे दाबाव सुमारे दोनशे कलावंतांचा समावेश राहणार आहे तर जवळपास 18 एकर परिसरात हे महानाट्य नाशिककरांना अनुभवता येणार आहे. या महानाट्यात प्रमुख भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे आहेत. दररोज सायंकाळी सहा वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तर या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन महिंद्र महाडिक यांच्या असून डॉ. गिरीश ओक व प्राजक्ता गायकवाड, महेश कोकाटे हे प्रमुख भूमिकेत आहेत. 

गेल्या महिन्यात औरंगाबाद येथे या नाटकाचे प्रयोग झाले रंगमंचाच्या सहा लेव्हल, रोषणाई, आतषबाजी, एलईडी वॉल थेट प्रेक्षकांमधून घोड्यांचा रंगमंचावर प्रवेश आदी या महानाट्याची वैशिष्ट्ये असणार आहेत, त्यात संभाजी महाराजांच्या बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा प्रवास मांडण्यात येणार आहे. या शिवसृष्टीत महाराजांचे स्वराज्याचे संकल्प पूर्णत्वास नेणारे विविध किल्ले, गड यांच्या आकर्षक आणि मूर्तीमंत प्रतिकृती प्रतिकृती रसिकांना एकत्रित बघता येणार आहेत. सशुल्क असणाऱ्या महांना त्यासाठी दहा हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्यात स्थानिक कलावंतांनाही सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

live reels News Reels

लवकरच तिकीट विक्री 
संभाजी महाराजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट नाही, त्यांचा खरा इतिहास तर्कसंगत पद्धतीने पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी हे महाराष्ट्र सादर करीत असून ज्वलंत इतिहास काळजात साठवून ठेवण्याची ही संधी असल्याचे डॉ. कोल्हे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान महानाट्याच्या ठिकाणी फूड स्टॉल विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टी, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतीही राहणार आहेत. सशुल्क असलेले हे महानाक ते एकाच वेळी दहा हजार पेक्षा पाहू शकणार आहेत. त्याचा कालावधी मध्यंतरासह तीन तासांचा आहे. त्याच्या तिकीट विक्रीला इथे 8 जानेवारी पासून महाकवी कला मंदिरासह बुक माय शोवर सुरुवात होणार आहे, असे जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here