पुणे : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चंद्रपूर इथे सभेत ‘माझ्यावर चौकशी लावण्यासाठी काही मिळत नाही म्हणून माझा अपघात घडवला जाऊ शकतो, असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावरूनच शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी ‘तुम्ही जर हेड्रेट क्रिएट केला, तुम्ही जर हिंसाचार निर्माण होईल अशी भाषा वापरली आणि समोरच्या व्यक्तीचा तोल सुटला तर काही घडू शकतं’. असं म्हणत अंधारे यांना टोला लगावला आहे.

केसरकर यांच्या विधानानंतर सुषमा अंधारे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी माझ्या संबंधित घातपाताची शक्यता, शंका व्यक्त केली. आज माध्यमांसमोर बोलताना दीपक केसरकर यांनी माझ्या शंकेला पुष्टीच दिली आहे. केसरकर माध्यमांसमोर बोलताना असं म्हणत आहेत की सुषमा अंधारे यांनी भाषा सुधारली पाहिजे त्यांची भाषा अशीच राहिली तर घातपात होऊ शकतो. केसरकर बोलताना मला हेच जाणवलं की गोड बोलून काटा काढणे याला दुसरं काय नाव असू शकतं तर ते म्हणजे दीपक केसरकर. केसरकर यांनी किती शांत भाषेमध्ये सहज ही गोष्ट कमिट केली. वरून ते सांगतात की हेड्रेट बोलणं थांबलं पाहिजे’. असं जोरदार प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिले आहे.

पुण्याकडे निघालेल्या २० वर्षाय तरुणाने सगळ्यांनाच हादरवलं, झडती घेताच पोलिसही चक्रावले
दादाहो, ताईंनो, भावाहो असं बोलणं हेट्रेट असतं का हे केसरकरांनी मला सांगावं. हे म्हणणं जर हॅट्रेट असेल तर आपल्या मंत्रिमंडळातील अब्दुल सत्तार हे जेव्हा भिकरचोट हा शब्द वापरतात, गुलाबराव पाटील नटी म्हणतात, प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतात, सदा सरवणकर हवेत गोळीबार करतात, बुलढाण्याचे संजय गायकवाड चुन-चुनके मारण्याची भाषा करतात तेव्हा हा काय सत्संग असतो का ?असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.

केसरकर जी बोलताना जरा आरशात पाहत, चला अभ्यास करा. तुमच्या मंत्रिमंडळात तुम्ही काय लोक भरली आहेत ते पाहा. आता राहिला प्रश्न माझा माझ्या घातपाताला शक्य तेवढी पुष्टी दिली काय किंवा तसा प्रयत्न केला काय?, मी कपटनीती आणि कूटनीतीच्या विरोधात लढाईतच आहे हे पक्क केलेला आहे. असं अंधारे म्हणाल्या आहेत.

काय म्हणालेत दीपक केसरकर ?

सुषमा अंधारे यांची स्टेटमेंट बघा, ज्या प्रकारे वेगवेगळी स्टेटमेंट त्या देतात हिंदू देवतांबद्दल वाईट बोलत होत्या. ठाकरे फॅमिली बद्दल वाईट बोलत होत्या, एवढंच नाही तर बाळासाहेबांबद्दल देखील त्या अत्यंत वाईट बोलत होत्या. त्या सुषमा अंधारे आता शिवसेनेच्या प्रवक्त्या बनल्या आहेत यापेक्षा दुर्दैवी प्रसंग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर येऊ शकत नाही.

सुषमा अंधारे सारख्या व्यक्तीने विचार करायला हवा की आपण आधी काय बोलत होतो आता काय बोलत आहोत. त्यांचा घातपात कोणीच करणार नाही. मात्र त्या महाराष्ट्राचा घातपात करत सगळीकडे फिरत आहेत. त्यामुळे त्यांनाच वाटत असेल की मी इतकी फायरी बोलते त्यामुळे माझा कोणी घातपात करू शकत. त्यांना असं वाटत असेल तर त्यांनी आपलं बोलणं सुधाराव. प्रत्येकाला ही संधी असते. आपण समोरच्या माणसाला जास्त चिडवत राहिलो तर समोरचा माणूस एके दिवशी अंगावर येतो. ही माणसाची प्रवृत्ती आहे. तिथपर्यंत जायला कोणावर पाळी येता कामा नये एवढं वाईट आपण बोलू नये प्रवक्ता म्हणून सांगू इच्छितो.

बोलणं जर चांगला असेल तर लोक सन्मान करतात, लोक स्वागत करतात. मात्र तुम्ही जर हेड्रेट क्रिएट केला, तुम्ही जर हिंसाचार निर्माण होईल अशी भाषा वापरली तर समोरच्या व्यक्तीचा तोल सुटला तर काही घडू शकतं. पण त्यांच्याबाबत असं काही घडू नको अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी महाराष्ट्र शासन सक्षम आहे यांनी मागणी करावी त्यांना पुरेसं संरक्षण दिलं जाईल.

पुण्यात द्राक्षरस देऊन आजारातून बरा करण्याचा दावा; धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here