मुंबईः राज्यात करोना व्हायरसचा प्रसार झपाट्यानं वाढत आहे. आज राज्यात २९८ रुग्णांनी करोनामुळं जीव गमालव्यानं एकूण करोनामृतांची संख्या १२ हजार ८५४ इतकी झाली आहे. राज्यात आज ९ हजार ८९५ करोना रुग्ण सापडले आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

राज्यात करोनाचा विळखा अधिकच घट्ट बसत चालला आहे. काल तब्बल १० हजारांच्यावर सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली होती. तर आजही साडे नऊ हजार रुग्ण आढळले आहेत. यामुळं एकूण करोना रुग्णांची संख्या ३ लाख ४७ हजार ५०२वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर ३. ७ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १७ लाख ३७ हजार ७१६ चाचण्यांपैकी ३ लाख ४७ हजार ५०२ (२० टक्के) अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

वाचाः

करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी रुग्ण बरो होण्याची संख्यादेखील वाढत आहे. आज राज्यात ६४८४ रुग्णांनी डिस्चार्ज मिळाला आहे. तर आत्तापर्यंत १ लाख ९४ हजार २५३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५. ९ टक्के आहे. तर विविध रुग्णालयात १ लाख ४० हजार ०९२ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात सध्या ८ लाख ७४ हजार २३६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ४५ हजार २२२ व्यक्ती संस्थांत्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here