मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सनदी अधिकारी समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांना कोणताही दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिलाय. सीबीआयच्या कारवाईपासून संरक्षण देण्याची वानखेडे यांची मागणी न्यायालयाने नाकारली आहे. सीबीआयकडून कोणतीही नोटीस नसताना केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर कोणताही दिलासा देता येणार नाही, असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. 

सीबीआयच्या कारवाईपासून संरक्षण देण्याच्या मागणीला हायकोर्टाने नकार दिल्यानंतर समीर वानखेडे यांनी आपली याचिका मागे घेतली आहे. कारवाईपासून संरक्षण देण्याच्या मागणीला नकार दिला असला तरी भविष्यात नव्यानं सुधारीत याचिका दाखर करण्यास कोर्टाने वानखेले यांना परवानगी दिली आहे. 

एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक असताना समीर वानखेडेंच्या काळात एनसीबीनं बॉलिवूडच्या अमली पदार्थ संबंधांविरोधात मोठी मोहीम चालवली होती. त्यावेळी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप झाले होते.  

चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात फसलेले समीर वानखेडेंची बदली करण्यात आली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर होते. ते महसूल गुप्तचर संचालनालयात तैनात आहेत.

live reels News Reels

समिर वानखेडे यांच्या याचिकेवर न्यायमुर्ती अनुप जयराम बम्बानी यांच्यासमोर आज सुनावणी झाली. या कारवाईबाबत वानखेडे यांच्याकडे कोणताही कागदोपत्री पुरावा नव्हता. केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर ही याचिका करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर वानखेडे यांनी ही याचिका मागे घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ही याचिका मागे घेण्यास परवानगी दिली. तसेच तपास यंत्रणेने चौकशीसाठी काही पत्रव्यवहार केल्यास त्याआधारावर तुम्ही संबंधित न्यायालयात दाद मागू शकता, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

समिर वानखेडेंनी आपल्या याचिकेत काय म्हटले?

माझ्यावर बेहिशेबी संपत्तीचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मला अटक होऊ शकते. जप्तीची कारवाई होऊ शकते. माझ्या मालमत्तेची तपासणी होऊ शकते. तशी सूचना अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने केंद्रीय तपास यंत्रणेला (सीबीआय) केली आहे. या कारवाईपासून मला संरक्षण द्यावे, अशी मागणी वानखेडे यांनी आपल्या याचिकेत केली होती. 

महत्वाच्या बातम्या

Sameer Wankhede: राजकारणात वानखेडे दाम्पत्याची एन्ट्री होणार? वर्तमानपत्रातील शुभेच्छांच्या जाहिरातीमुळे चर्चांना उधाण 


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here