अमरावती: मध्य प्रदेशच्या हद्दीत येणाऱ्या धबधब्याच्या डोहात बुडून येथील तिघांचा मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. तिघेही मृत तरुण अमरावती येथील रहीवासी आहेत. आशिष कोटेचा (), दीपक मिश्रा व विनय कुशवाह (रा. दोघेही अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत. ( Three Drown In Dharkhora Waterfall )

वाचा:

धारखोरा धबधबा हा धारणी तालुक्यातील बुरडघाट येथून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. सदर घटनास्थळ परतवाडापासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे. अमरावती येथील सहा युवक कारने मेळघाटात पर्यटनासाठी गेले होते. यात अमरावतीच्या मसानगंज येथील तरुण देखील त्यांच्यासोबत सहलीला गेले होते. हद्दीत येणाऱ्या घटांग ते सावलमेंढा वनपरिक्षेत्राच्या सीमेवरील धारखोरा धबधबा पाहण्यासाठी सर्वजण पोहोचले. यावेळी काही जण आंघोळीसाठी डोहात उतरले. परंतु, आशिष कोटेचा, दीपक मिश्रा व विनय कुशवाल या तिघांना पोहण्याचा मोह अनावर झाला. यामुळे त्यांनी धबधब्यातील डोहात उडी मारली. बराच वेळ तिघेही पाण्याबाहेर आले नाही. यामुळे त्याच्या मित्रांनी शेजारच्या गावकऱ्यांना ही माहिती दिली. घटनास्थळ महाराष्ट्र-मध्य प्रदेश वनपरिक्षेत्र सीमेवर असल्याने बैतुल पोलिसांना घटनेची माहीती मिळताच ते देखील घटनास्थळी पोहोचले. बैतुल पोलिसांनी तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. यानंतर काही वेळातच परतवाड्याचे ठाणेदार सदानंद मानकर यांचेसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बुडालेल्या युवकांचे मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी परतवाडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे.

वाचा:

घटनास्थळ महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर

धारखोरा धबधबा हा दोन वनपरिक्षेत्राच्या सीमेत विभागला गेला आहे. त्यामुळे घटनास्थळ परतवाडा पोलीस ठाणे हद्दीत येत आहे. घटांग वनपरिक्षेत्र मेळघाटात आहे व सावलमेंढा वनपरिक्षेत्र मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here