बुलढाणा : सध्या राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून बहुतांश ठिकाणी तापमानात घट होत आहे, तर तुरळ ठिकाणी पाऊसही कोसळत आहे. अनेक भागांमध्ये रात्री आणि सकाळी धुक्याची चादर पसरत असल्याचं चित्र आहे. अशातच रात्रीच्या धुक्यामुळे एक अपघात झाला असून यामध्ये ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेलुद येथे गुरुवारी ५ जानेवारी रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली.
या अपघातात रवी तेजनकर यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले, तर सिद्धेश्वर शेवाळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचे दोन्ही पाय व हात फ्रॅक्चर झाले आहेत.
दरम्यान, एका खासगी दवाखान्यासमोर पॅथॉलॉजी लॅब चालवणाऱ्या रवी तेजनकर यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. रवी तेजनकर यांच्या पश्चात आई-वडील ,पत्नी ,दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.