Sangli News : सांगलीच्या मिरजमध्ये (Miraj) जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Mla Gopichand Padalkar) यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांनी अतिक्रमण पाडल्याने वाद निर्माण झाला आहे. सदर वादग्रस्त जागेचा निकाल ब्रम्हानंद पडळकर यांच्या बाजुने लागला आहे. महापालिकेनं नोटीस दिल्यानं हे अतिक्रमण हटवल्याचा दावा ब्रम्हानंद पडळकरांनी केला आहे. अतिक्रमण हटवण्याला गाळ्यातील भाडेकरुंनी विरोध केला आहे. यावेळी दोन गटात राडा झाला. जागेचा ताबा घेण्यासाठी गाळे पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

जागेचा ताबा घेण्यासाठी गाळे पाडले, गाळेधारकांचा आरोप

जेसीबीने हॉटेल, दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर त्या गाळ्यामधील भाडेकरूंनी या घटनेला विरोध केला. जागेचा ताबा घेण्यासाठी गाळे पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज रोडवर बसस्थानकाशेजारी घडली. घटनास्थळी रात्रीपासूनच  पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. 

गाळेधारक आक्रमक, जेसीबीच्या काचा फोडल्या 

जेसीबीच्या काचांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी ही जागा घेतल्याचा दावा केला जात आहे. या जागेचा निकाल ब्रम्हानंद पडळकर यांच्या बाजुने लागल्याचे सांगितले जात आहे. याबाबत महापालिकेने अतिक्रमण काढाची नोटीस दिली होती. त्यानंतर हे गाळे पाडण्यात आले आहेत. पाडापाडी सुरु असताना गाळेधारक मात्र चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. गाळेधारकांनी पाडापाडी करण्यास विरोध केला. यातून दोन गटात वाद झाला. यामध्ये गाळेधारकांनी जेसीबीच्या कांचा फोडल्या आहेत. सध्या काम थांबले आहे. याप्रकरणी गाळेधारक मिरज पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी गेले आहेत. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

live reels News Reels

वाद चिघळू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त 

वाद चिघळू नये म्हणून पोलिसांना योग्य ती खबरदारी घेतली आहे. मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज रोडवर बसस्थानकाशेजारी घडली आहे. मेन रोडवरचे हे गाळे पाडण्यात आले आहेत. त्यामुळं तिथे नागरिकांची मोटी गर्दी झाल्याचेही पाहायला मिळालं. दरम्यान याप्रकरणी आता नेमक्या काय बाबी समोर येणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

3 COMMENTS

  1. 14 novembre 2022 Dans les cultures occidentales, le mahjong solitaire est la version la plus populaire : c’est à celle-ci que vous jouerez dans Holiday Mahjong Dimensions. Support 24h/24h Acheter des jeux Dans chaque catégorie, on retrouve beaucoup d’autres rubriques. Dans la catégorie sport par exemple, vous trouverez les jeux de foot, les jeux de tennis, les de jeux de golf, les jeux de billard… Le mahjong a été inventé il y a plus de 200 ans en Chine, sous la dynastie Qing, et se jouait à 4 joueurs avec 114 tuiles de mahjong. Lorsque le jeu fut adopté par d’autres cultures au XXe siècle, de nouvelles variantes apparurent. Tous les logiciels sur Tom’s Guide ont été testés pour vous garantir qu’ils ne contiennent aucuns virus et logiciels malveillants.
    https://marcouzyu245560.theobloggers.com/19679195/supermarché-casino-troyes
    À l’ère de l’industrie du numérique et des changements de tactique en placement publicitaire, Baron offre maintenant un nouveau service qui consiste à positionner le client à l’intérieur de contenu éditorial de qualité sur le réseau de Baron. Programme B est une plateforme intégrée de partage de contenu qui permet aux commerçants de se joindre à la conversation avec leur propre histoire et leur expertise. Choisissez le contenu que vous préférez, qu’il soit écrit, vidéo, photo ou audio. Ces jeux à gratter sont un peu comme les machines à sous car ils permettent d’avoir très rapidement le résultat d’un tirage comme un jeu de loterie. Il est nécessaire de bien connaître les règles pour augmenter vos probabilités de gagner et pour bien choisir n’hésitez pas à choisir le jeu gratuit de grattage qui vous conviendra.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here