Buffalo Birthday: एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचा वाढदिवस (Birthday) असला तर शहरातील चौकाचौकात लागणारी होर्डिंग, बँडेड केकसोबतच जेवणाच्या पार्ट्या असे काही चित्र आता अनेकदा पाहायला मिळते. मात्र औरंगाबादमध्ये (Aurangabad) एक आगळावेगळा वाढदिवस साजरा झाला असून, त्याची चर्चा जिल्हाभरात पाहायला मिळत आहे. कारण एखाद्या नेत्याला किंवा सेलिब्रिटीला लाजवेल असा वाढदिवस चक्क रेड्याचा (Buffalo Birthday) साजरा करण्यात आला आहे.  सूरज असे या रेड्याचे नाव असून, या रेड्याच्या वाढदिवसाला शहरभर होर्डिंग लावत तब्बल 700 पाहुण्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते. 

औरंगाबादचे शंकरलाल पहाडिया यांच्याकडे असलेला  नागपूर हेटी प्रजातीचा सुरज रेडा यंदा दोन वर्षांचा झाला आहे. आपल्या मुलाप्रमाणे पहाडिया यांनी सूरजचा सांभाळ केला आहे. तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील सुरजवर सतत जिवापाड प्रेम केले. त्यामुळे सूरजचा वाढदिवसही देखील अविस्मरणीय पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय पहाडिया कुटुंबातील सदस्यांनी घेतला. 6 जानेवारीला सूरजचा वाढदिवस असल्याने महिन्याभरापूर्वीच त्याची तयारी सुरु झाली होती. 

शहरभरात होर्डिंग आणि 700 पाहुण्यांना आमंत्रण! 

आपल्या मुलाप्रमाणे जीव लावलेल्या सुरज रेड्याचा वाढदिवस जंगी साजरा करण्यासाठी पहाडिया यांनी महिन्याभरापूर्वीचतयारी सुरु केली. सूरजचा दुसरा वाढदिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा होणार असल्याने शहरात त्याच्या वाढदिवसाचे आठ ते दहा दिवसांपूर्वी होल्डिंग लावले. हटके वाढदिवसाच्या होर्डिंगमुळे शहरात जोरदार चर्चा सुरु झाली. तर या हटके वाढदिवसासाठी थेट नांदेड व जालन्यातून 50 पाहुणे आले होते. आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणात व्हेज पुलाव, बिर्याणी कचुंबर तयार करण्यात आला होता. यावेळी एकूण 700 च्या जवळपास पाहुण्यांना जेवणावेळसुद्धा देण्यात आली. तर सुरज माझ्यासाठी मुलापेक्षा कमी नाही. त्यामुळे त्याचाही मुलाप्रमाणे आणि त्यापेक्षा देखील अधिक चांगला करण्याचा ठरवत हा वाढदिवस साजरा केल्याचं शंकरलाल पहाडिया म्हणतात. 

live reels News Reels

सुरजवर महिन्याला 12 हजारांचा खर्च..

शंकरलाल पहाडिया हे पशुपालक अहिर गवळी समाजाचे असून, त्यांनी सूरजचा मुलाप्रमाणेच सांभाळ केला. एवढंच नाही तर पहाडिया हे सुरजवर महीन्याला 12 हजार रुपये खर्च करतात. सूरज रोजचा आहार म्हणजे सकाळी दोन लिटर दूध व संध्याकाळी दोन लिटर दूध आणि दररोज चार किलो सरकी पेंड, दोन किलो गहू भरडा, महिन्याला पाच हजारांचा कडबा असा आहार आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aurangabad News: आश्चर्यच! चक्क घोड्याच्या दशक्रिया विधीला मुंडन, कीर्तनासोबत लाडूची पंगत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here