Ramdas Kadam on Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गद्दारी केल्याची टीका शिंदे गटाचे (Shinde Group) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शरद पवार (Sharad Pawar) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या दावणीला बांधल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) काळात मुलगा योगेश कदम आमदार असतानाही अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला निधी दिला. आम्हाला राजकारणातून संपवण्याचा कट अनिल परब यांनी रचला होता. त्याचसोबत शिवसेनेच्या फुटीला अनिल परब जबाबदार असून त्यांची ईडीकडून चौकशी व्हायलाच हवी. अनिल परब यांची जागा जेलमध्येच असल्याचा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे. 

अनिल परब यांची ईडी चौकशी झालीच पाहिजे, त्यांची जागा जेलमध्येच : रामदास कदम 

महाविकास आघाडीतील माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे. अनिल परब यांची ईडी चौकशी झालीच पाहिजे. अनिल परब यांची जागा जेलमध्येच आहे, असं सांगत रामदास कदम यांनी संताप व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझा मुलगा दापोलीत शिवसेनेचा विद्यमान आमदार असतानाही अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या पडलेल्या माजी आमदाराला निधी देऊन शिवसेना आमदार योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा डाव खेळला होता, असा आरोपही रामदास कदमांनी केला आहे. 

पाहा व्हिडीओ : Ramdas Kadam Full Video : उद्धवजी तुमचं कर्तुत्व काय? रामदास कदम यांचा थेट सवाल

live reels News Reels

अनिल परब हा उद्धव ठाकरेंचा चमचा असून शिवसेना फुटीला कारणीभूत ठरणारे अनिल परब यांची जागा जेलमध्येच आहे, असं संतापजनक वक्तव्य बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी केलं आहे. जामगे येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना रामदास कदम यांनी ही टीका केली आहे.

दरम्यान, शिवसेनेत फुट पडून शिंदे गटाची निर्मिती झाल्यानंतर रामदास कदम यांनी ठाकरे गटातील काही नेत्यांवर गंभीर आरोप करत शिंदे गट जवळ केला होता. तेव्हापासूनच सातत्यानं रामदास कदमांकडून ठाकरे आणि ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर टीकेची तोफ डागली जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

MLA Yogesh Kadam Accident : कशेडी घाटात टँकरची धडक, गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर; नेमका कसा झाला योगेश कदम यांचा अपघात?

1 COMMENT

  1. So many bots to choose from. Mоst off them hɑve
    veгy profitable strategies hen սsed in the rіght wɑy.

    Fees arе meager!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here