सुरक्षेविना फिरून दाखवा, असं आव्हान संजय राऊत यांनी नारायण राणेंना दिलं होतं. हे आव्हानही राणे यांनी स्वीकारलं आहे. ‘संजय राऊत यांनी मला सुरक्षेविना फिरण्याचं आव्हान दिलं. कुठे यायचं हे राऊतांनी सांगावं, मी आजच तिथे यायला तयार आहे,’ असं ते म्हणाले. ‘माझा इतिहास शिवसेना घडवण्यामध्ये आहे, शिवसेना संपवण्यामध्ये नाही. संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली, आज त्यांना शिवसेना संपवण्याचाच आनंद होत आहे. शिवसेनेचे राज्यात ५६ आमदार होते. आता फक्त १२ उरले आहेत आणि ते उरलेले घालवण्यासाठी राऊत तयार आहेत,’ अशा शब्दांत राणेंनी समाचार घेतला आहे.
‘आम्ही विकासाचं राजकारण करत आहोत. राज्याचा विकास व्हावा, रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी मी आणि माझा पक्ष प्रयत्न करत आहे. मात्र संजय राऊत यांचं एक तरी विधायक काम दाखवा,’ अशा असा हल्लाबोलही नारायण राणे यांनी यावेळी केला.