Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात कोयते घेऊन हल्ले सुरू असताना दुसरीकडे आता थेट गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रकार नाशिक शहरातील इंदिरानगर भागात समोर आला आहे. तर प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांनी नाशिक शहर हादरलं असून यावर तातडीने पाऊल उचलण्याची गरज असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे. 

नाशिक शहरातील वाढते गुन्हेगारी (Crime) पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नवीन वर्षातही सातत्याने गुन्हेगारीच्या घटना या समोर येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अशातच नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात दिवसाढवळ्या गोळीबाराचे घटना समोर आली आहे. अविनाश विक्रम टिळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. इंदिरानगर बोगदा येथील संत सावता माळी मार्ग या ठिकाणी फिर्यादी आणि त्यांचे मित्र हे संशयित सुनील चोरमारे यांच्याकडून वापरण्यास घेतलेली कार परत देण्यासाठी आले असता संशयित सुनील चोरमारे आणि त्यांच्या मित्रांनी उपस्थितांवर गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला. आज तुम्हाला जिवंत सोडत नाही, अशी धमकी देत फिर्यादीने फिर्यादीच्या दिशेने गावठी कट्टा रोखत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हवेत गोळीबार होताच फिर्यादी अविनाश आणि त्यांच्या मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढत आपला जीव वाचवला. 

अशीच दुसरी एक घटना सातपूर परिसरात घडली असून फिर्यादीनुसार संशयितांनी फिर्यादीसोबत झालेल्या भांडणाची कुरापत काढून सातपूर परिसरातील अशोक नगर येथील छोटू वडापाव दुकान येथे फिर्यादीच्या भावास गाठून त्याच्या डोक्यात आणि हातावर थेट कोयत्याने वारकरी गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात  संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना नाशिक रोड परिसरात घडली असून मागील भांडणाच्या कुरापतीवरून युवकावर कोयता चौकार आणि तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघे मित्र सामनगाव रोड वरून मित्राच्या घरून स्वतःच्या घरी जात असताना संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून कुणाल फिर्यादी यास पकडून चोपरसह कोयत्याने वार केल्याची घटना घडली.

खरं तर धार्मिक नगरी, ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहराचे सामाजिक स्वास्थ सध्या बिघडले असून दिवसाढवळ्या सर्रास प्राणघातक हल्ले, मारहाण करण्याच्या घटना होत आहेत. या सर्व घटनांनी शहरात कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. चॉपर, तलवा कोयत चाकू गावठी कट्टा याचा सर्रास वापर सुरू असल्याने सामान्य नागरिकांना परिसरात वावर करणे कठीण झाले आहे. यावर तातडीने नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी पाऊल उचलणं गरजेचं असल्याचे दिसत आहे. 

live reels News Reels

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik News : नाशिक मनपात लाचखोरीचं प्रमाण वाढतंय; लिपिकासह शिपाई एसीबीच्या जाळ्यात 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here