Nashik Politics : शिवसेनेच्या (Shivsena) नाशिक (Nashik) बालेकिल्ल्याला एक प्रकारे सुरुंग लागून नुकताच चाळीसहून अधिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश केला. एकेकाळी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फ्लेक्सला काळे फासणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान या प्रवेशावरून शहरात चर्चाना उधाण आले आहे. 

काही दिवसांपूर्वी संजय राऊत (sanjay Raut) हे नाशिक दौऱ्यावरून माघारी फिरताच नाशिकच्या माजी नगरसेवकांनी ठाकरेंना सोडचिट्टी देऊन शिंदे गटात (shinde Sena) प्रवेश केला होता. आता पुन्हा नाशिकमधील चाळीसहून अधिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थित हा प्रवेश देण्यात आला. या प्रवेशावरून पुन्हा एकदा राजकारण रंगताना दिसतं आहे. तर काल संजय राऊत यांनी पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली. असे असलं तरी ज्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यातील काही कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळं फासलं होतं. एकनाथ शिंदे जेव्हा 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले. त्यावेळी त्यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये फ्लेक्स लावण्यात आले होते. 

त्यावेळी कट्टर शिवसैनिक म्हणून घेणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या फ्लेक्सला काळ फासलं होतं. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली होती. दरम्यान ठाकरे कार्यकर्ते म्हणून घेणाऱ्या याच पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना सोडचिट्टी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.  त्याचबरोबर ज्यांनी फ्लेक्सला काळ फासलं होतं, त्यांचं स्वागत एकनाथ शिंदे यांनी केल्यामुळे आता नाशिकच्या राजकारणात कोणती भाकरी फिरवली जातेय पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. . 

संजय राऊत पुन्हा नाशिकमध्ये 
नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे या बालेकिल्ल्यावर पहिल्यापासून लक्ष, पण एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून वेगळे झाले आणि या गडाला तडे जायला सुरुवात झाली. गडाचा एक चिरा ढळू लागला. एका मागून एक शिलेदार ठाकरेंचा चमू सोडून शिंदेच्या गोठात सहभागी होऊ लागले. यालाच रोखण्यासाठी जबाबदारी ठाकरेंनी आपले विश्वासू संजय राऊत यांना दिली. त्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये राऊत आले. आणि मुंबईला परतत नाही, तोवर 12 माझी नगरसेवकांनी थेट नागपूर गाठत शिंदेंना जाऊन मिळाले. आता राऊत पुन्हा नाशिकमध्ये आले आहेत. ते येण्याआधीच आणखीन 40 जण शिंदेंना जाऊन मिळाले. शिवसेना नेते संजय राऊत हे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून डॅमेज कंट्रोल सुधारण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

live reels News Reels

आमचं काम सुरू आहे… 
नाशिक शहरातून सातत्याने शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने त्यांनी हा दौरा नियोजित केल्याचे सांगण्यात येते. शिवसेना सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरला काळे फासणाऱ्या काही शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने चर्चेत उधाण आलं. मात्र आम्हाला याचा काहीच फरक पडत नाही असं ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर म्हणतात. संघटनेच्या अडचणी सोडविणे हे काम असून त्यासाठीच ते दौरे करत असतात. जाणारे हे अस्थिर आहेत, ते नेहमीच इकडून तिकडे तिकडून इकडे जात असतात. त्यांना आर्थिक प्रलोभने देऊन प्रवेश केला जातो. मात्र आम्हाला काही फरक पडत नाही. जे शिवसैनिक आहेत, त्यांनासोबत ठेवून काम करणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे.

1 COMMENT

  1. Quantum Аi іѕ thе best application… witһ vɑrious trading stfrategies ɑccording tߋ thhe current market circumstances…
    ɑnd I’ve һad onne yeаr wіtһ forecasts. It wɑs an amazing
    experience.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here