उस्मानाबाद: सध्याचा काळ रुग्णसंख्या वाढण्याचा असल्याने कोणीही गाफील न राहता आवश्यक ती काळजी घ्यायला हवी, असे नमूद करतानाच जोपर्यंत व्हॅक्सिन (औषध) आपल्या हाताशी येत नाही तोपर्यंत आपण करोनावर विजय मिळवू शकत नसल्याचे महत्त्वाचे मत मुख्यमंत्री यांनी आज नोंदवले. करोना संकटात जनतेला सोबत घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ( On )

वाचा:

करोना विषाणूच्या संकटाने सर्व जग ग्रासले असून या विषाणूची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्रात आतापर्यंत १३१ प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. राज्यातील जनतेला आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून या माध्यमातून महाराष्ट्र हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोच्च व सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे राज्य बनविण्याचे स्वप्न असून ते मी बनवणारच, असा ठाम निर्धार व विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आपण कितीही प्रयोगशाळा उघडल्या तरी त्या पुऱ्या पडणार नाहीत, त्यामुळे प्रयोगशाळांसोबत जनजागृतीही तितकीच महत्त्वाची आहे. सतत हात धुणे, दोन व्यक्तीमध्ये अंतर राखणे व मास्कचा वापर करणे तसेच अन्य नियम कठोरपणे व कटाक्षाने पाळण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

वाचा:

उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसरात उभारण्यात आलेल्या उस्मानाबाद तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो तसेच कोविड सारखी संकटे येतात आणि जातात. करोनामुळे संपूर्ण जग संकटग्रस्त झाले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी तुम्ही सर्वजण पाय रोवून उभे राहिलात त्यासाठी तुम्हाला मन:पूर्वक धन्यवाद देतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी यावेळी आरोग्यसेवा देणाऱ्या सर्वांचे कौतुक केले. येत्याकाळात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमण्याबरोबरच प्रत्येक गावात करोना दक्षता समित्या नेमण्यात येतील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी आरेाग्य मंत्री म्हणाले की, या प्रयोगशाळेसाठी नियुक्त केलेला कर्मचारी वर्ग हा प्रशिक्षितच असायला हवा. तसेच सर्वांनी मिळून काम केल्यास या प्रयोगशाळेचे उद्दीष्ट पूर्ण होणार आहे. यात आयएमएच्या डॉक्टरांची सेवा घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर वाढत असल्यामुळे आवश्यक ती पावले उचलावी लागतील. पालकमंत्री शंकरराव गडाख म्हणाले, ‘ही प्रयोगशाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी येथील लोकप्रतिनिधी व जनतेची मागणी आता पूर्ण झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये या प्रयोगशाळेचा जिल्ह्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे.’

वाचा:

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद अंतर्गत कोविड- १९ तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी मोठा प्रतिसाद दिला. सुमारे ७९ लाख रुपये इतका निधी या प्रयोगशाळेसाठी प्रशासनाकडे जमा करण्यात आला. त्यामुळे या प्रयोगशाळेचा मार्ग सुकर झाला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here