Maharashtra Political News : मंत्री गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या कानशिलात लगावले असती असा उल्लेख करत आव्हान दिले आहे, यामुळे एकच राजकीय गदारोळ उडाला असून यावर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

अनेकजण आमच्यावर टीका करत आहेत. मात्र, आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी बाहेर पडलो असल्यास मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. संजय राऊतसुद्धा आमच्यावर टीका करत आहेत. महापुरुषांबद्दल काहीतरी बोलता येते. मात्र, मी खोलात जाणार नाही असे म्हणत संजय राऊत यांच्या नुसत्या दाढीवर जर एकनाथ शिंदेंनी हात ठेवला असता तर खासदार झाला नसता, आडवा पडला असता असा एकही उल्लेख करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर विखारी टीका केली आहे. त्यांना जे ४१ मते पडले ना ते असं केल्यामुळे पडले, हे सांगताना गालावर हात ठेवून मंत्री गुलाबराव पाटील यांनी नक्कल करत संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.