लातूर : आपल्या लेकरासाठी आई आपला जीव ओवाळून टाकते, पण मुलगी म्हटलं की आजही मुलगा-मुलगी समान मानणाऱ्या आधुनिक जगात अनेकांना नकोशी वाटते. त्यातूनच या कळया खुलण्यापूर्वी गर्भातच खुडल्या जाण्याचे प्रकार घडतात. अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे.

इथे चक्क जन्मदात्या आईनेच आपल्या अवघ्या तीन दिवसाच्या चिमुकल्या बाळाचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. उस्मानाबात जिल्ह्यातील होळी या गावाची रेखा किसन चव्हाण ही गर्भवती महिला लातूर जिल्ह्यातील काटगाव तांड्यावर माहेरी आली होती. दरम्यान २७ डिसेंबर रोजी तिला प्रसूती कळा सुरू झाल्याने जवळा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ती प्रसुतीसाठी दाखल झाली आणि तिने गोंडस मुलीला जन्म दिला.

क्षणात संपलं बाप-लेकीचं नातं; बहिणीला भेटून परतताना काळाचा घाला
रेखा चव्हाण यांना मुलगा होण्याची आशा होती. पण मुलीच्या जन्माने त्यांची निराश झाली. मुलगा वंशाचा दिवा, मुलगी परक्याचं धन. तिचं करायचं काय? असा विचार तिच्या मनात सुरू झाला अन् अखेर तिने आपल्याच अवघ्या तीन दिवसाच्या मुलीचा रुमालाने गळा आवळून खून केला. पण या काळया कृत्याची कुजबुज सुरू झाली अन् पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच हा प्रकार समोर आला. गतेवाग पोलिसांनी या प्रकरणी रेखाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रेखा चव्हाणला गातेगाव पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

बारामतीत अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ, असं कारण सांगितलं की ऐकताच पिकला हशा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here