Marathwada Teacher Constituency Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, 12 जानेवारीला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम काळे (Vikram Kale) बुधवारी 11 जानेवारी रोजी माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशी माहिती विक्रम काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 

7 फेब्रुवारी रोजी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. दरम्यान 29  डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ज्यात 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 13 जानेवारीला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. 16 जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. 30 जानेवारीला मतदान होणार असून, 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. तर 11 जानेवारीला विद्यमान आमदार विक्रम काळे आपला अर्ज दाखल करणार आहे. 

अजित पवारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार 

सद्याचे विद्यमान आमदार विक्रम काळे होते. गेली अठरा वर्षे शिक्षक मतदारसंघाचे ते नेतृत्व करत आहे. तर यावेळी देखील राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी दिली जात आहे. दरम्यान 11 जानेवारीला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तर यावेळी अजित पवार उपस्थित राहणार असून, त्यांच्या  उपस्थितीत काळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. तर यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी केली जात आहे.

live reels News Reels

असा रंगणार सामना…

राष्ट्रवादीकडून विक्रम काळे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर भाजपकडून काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले किरण पाटील जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरोधात भाजप अशी थेट लढत शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. दोन्ही पक्षाकडून आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे आता कोणाचा विजय होणार हे 2 फेब्रुवारीला मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. तर शिक्षक मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यासह जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड या आठ जिल्ह्यांचा समावेश असून, या मतदारसंघात 61 हजार 529  मतदार आहेत. यामध्ये 14 हजार 749 स्त्री मतदारांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here