मुंबई : करोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर अनेक नवीन संसर्गजन्य आजार समोर येत आहे. अशात आता ओमायक्रॉन बी १.१ व्हेरिएंटची लागण झालेले परदेशातून आलेले दोन प्रवासी मुंबई विमानतळावर आढळले आहेत.‌ मुंबई विमानतळावरील आरटीपीसीआर चाचणीत दोन प्रवासी करोना बाधित आढळले होते. या ९ प्रवाशांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवले असता दोन प्रवाशांना ओमायक्रॉन बी १.१ ची लागण झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. तर अन्य ७ प्रवाशांचा अहवाल येणे बाकी आहे.

चीन, जपान, कोरिया, अमेरिका, ब्राझिल, सिंगापूर, हाँगकाँग या देशांत बीएफ ७ विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असून करोनाचे नवे व्हेरिएंट समोर येत असल्याने जग पुन्हा एकदा चिंतेत आहे. देशात गुजरात व ओडिसमध्ये बीएफ ७ चे रुग्ण आढळल्यानंतर मुंबई विमानतळावरील रोज येणाऱ्या प्रवाशांपैकी २ टक्के प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते आहे.

क्षणात संपलं बाप-लेकीचं नातं; बहिणीला भेटून परतताना काळाचा घाला
विमानतळावर रोज १५ ते १७ हजार प्रवासी विविध देशांतून येतात. २६ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२३ दरम्यान आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली असता ९ जण करोना बाधित आढळले असून पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार दोन प्रवाशांना ओमायक्रॉन बी १.१ ची लागण झाली आहे.

ओमायक्रॉन बी १.१ व्हेरीयंटची लागण झालेल्या २ प्रवाशांपैकी एक पुरुष तर एक महिला प्रवासी आहे. मूळचा गोव्याचा १६ वर्षाचा पुरुष प्रवासी २६ डिसेंबर २०२२ रोजी लंडन येथून आला होता. तर २५ वर्षीय महिला २८ डिसेंबरला स्वित्झर्लंड येथून आली होती. ती नवी मुंबई येथील रहिवासी असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

साहेब, माझा नवरा हरवला! इंस्टाग्रामवर प्रेम मग लग्न; एक वर्ष संसार थाटला अन् महिलेसोबत घडलं अजबच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here