Pune Parking News : पुणे शहरातील (Pune City News) वाहतूक सुरक्षित (traffic rules)आणि सुरळीत चालण्याच्या अनुषंगाने पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त विजयकुमार मगर यांनी शहरातील पार्किंग आणि नो- पार्किंगसंबंधाचे काही अंतिम आदेश तर काही तात्पुरते आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता पुणेकरांना पार्किंग करावं लागणार आहे. मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडीबरोबरच पार्किंगचीदेखील मोठी समस्या उद्भवली आहे. त्यामुळे हे आदेश काढण्यात आले आहेत. 

यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर प्राप्त हरकती आणि  सूचनांचा विचार करुन काही बाबतीत अंतिम आदेश जारी केले आहेत. त्यानुसार विमानतळ वाहतूक विभागांतर्गत विमाननगर लेन क्रमांक 2 ते श्रीकृष्ण हॉटेल आणि दत्त मंदीर चौक ते अपसाउथ हॉटेल लेन (विमाननगर लेन क्रमांक २) दरम्यान नो- पार्किंग घोषित करण्यात आले आहे. तर हॉटेल सांबर लेनच्या सुरवातीपासून ते अपसाउथ हॉटेल तसेच दत्त मंदिर चौक ते कैलास सुपर मार्केट चौक आणि द्वारका गार्डन चौक ते संघर्ष चौकापर्यंत सुमारे 200 मीटर पर्यंत पी 1पी 2 असलेले पार्किंग घोषित करण्यात आले आहे. हे आदेश अग्नीशमन, पोलीस वाहने, रुग्णवाहिका या अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी लागू नसतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 तात्पुरत्या स्वरुपातील आदेशांवर हरकती आणि सूचना देण्याचे आवाहन

वाहतूक शाखेने विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत जिजामाता चौक ते फुटका बुरुज चौक तसेच फुटका बुरुज चौक ते वसंत दाते चौक या दरम्यान नो- पार्किंग घोषित करण्यात आल्याबाबतचे तात्पुरते आदेश जारी केले आहेत. त्याबाबत नागरिकांना काही हरकती आणि सूचना असल्यास पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखा, येरवाडा टपाल कचेरी, बंगला क्रमांक 5, पुणे येथे 17 जानेवारी 2023 पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या हरकती आणि सूचनांचा विचार करुन अंतिम आदेश जारी करण्यात येतील, असेही मगर यांनी स्पष्ट केलं आहे.

live reels News Reels

 वाहतूक कोंडी अन् पार्किंगची समस्या

शहरात दिवसेंदिवस गाड्यांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या वाहतूक कोंडीवर अनेक उपाययोजना करण्यात आल्या मात्र तरीदेखील वाहतूक कोंडी कायम असल्याचं चित्र आहे. मेट्रोच्या कामामुळेदेखील वाहतूक कोंडी होत असल्याचं नेहमीच समोर आलं आहे. त्यात आता पार्किंगचीदेखील समस्या उद्भवली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here