Chitra Wagh – Urfi Javed Dispute: ”अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) व भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील आरोप- प्रत्यारोप वाढत असून हे थांबले पाहीजेत. हे थांबविण्याची सुरवात आम्ही आमच्यापासून पक्षापासून करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा”, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. तसेच हे गलिच्छ राजकारण थांबवाव, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्टीच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘वेध भविष्याचा, विचार राष्ट्रवादीचा’ आयोजित एकदिवसीय शिबिर आयोजित केले होते. ज्येष्ठ पत्रकार मधूकरजी भावे यांनी ‘महाराष्ट्राचे राजकारण… काल, आज, उद्या’ या विषयावर माहिती दिली. खासदार सुळे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. शिबिरानंतर माध्यमांशी बोलताना त्या असं म्हणल्या आहेत.

विचित्र कपडे घालणाऱ्या उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्यावरून सध्या राज्यात महिला नेत्यांचे परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी हे उत्तर दिलं. त्या म्हणल्या की, गेली अनेक आठवडे राज्यभर संधी मिळेल तिथे मी हेच सांगतेय हे थांबवा. माझी सर्व पक्षांना विनंती आहे. हे आरोप- प्रत्यारोप थांबले पाहीजेत. अनेक पक्षांच्या नेत्यांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. अनेक महिन्यांपासून मी पाहत आहे. महिलांना मातेसन्मान जिथे होतो, तिथे हे घडतंय. प्रत्येकाच्या घरात मुली आहेत. मूलांसोबत कशा बातम्या बघायच्या. हे महाराष्ट्राचं जनरल नॅालेज आहे का? असा सवाल देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

महाराष्ट्राचा विरोधात षड्यंत्र 

”बेळगाव राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री राज्याच्या विरोधात बोलतात. आपले मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. गृहमंत्री अमित शाह यांना आम्ही महाविकास आघाडीचे खासदार भेटलो. त्यानंतर मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांना दिल्लीला बोलावले. शाह यांनी  बेळगाव विषय कोर्टात काय होते ते बघू. याबद्दल आम्ही त्यांचे जाहिरपणे आभार मानतो. शाह बोलले तरी, कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी आरोप केले. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री बोटचेपेपणाची भूमिका घेतात. यामुळे महाराष्ट्राचा विरोधात षड्यंत्र अशी शक्यता आहे, असे वाटते”, असं सुळे म्हणालाय आहेत.

live reels News Reels

अजित पवार यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणल्या आहेत की, ”अजित पवारांबद्दल एवढे लोक विरोध करीत असल्याने, दादा विरोधी पक्षनेता आहे की, मुख्यमंत्री हेच कळत नाही. अजित पवारांवर हल्ला केला की, महागाईवर चर्चा बंद.. रूपयावरील चर्चा बंद. विरोधी पक्षेते बोलता तर बोलला.. तुम्ही का करताय.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here