कोल्हापूर: जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात अचानक संसर्ग वाढला. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने सात दिवसाचा कडक जाहीर केला आहे. त्यामुळे सारे कोल्हापूर लॉक झाले आहे. पण यामुळे नुकतेच चित्रीकरण सुरू झालेल्या मालिकांच्या निर्मात्यावर मोठे संकट आले. मालिकांचे नवे भाग दाखवायचे असतील तर चित्रीकरण करणे अत्यावश्यक होते. अशावेळी त्यांच्या मदतीला धावली. सोशल डिस्टन्सिंगचे सारे नियम पाळत चित्रनगरीत ‘’चे चित्रीकरण झाले आणि निर्मात्यासह सर्वांनीच सुस्कारा सोडला. ( Serial Shooting )

वाचा:

मार्च महिन्यात करोना संसर्ग वाढू लागला. त्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे सर्व व्यवहार बंद झाले. त्यामध्ये सिनेमा, मालिका यासह वेबसीरिज, शॉर्टफिल्म ,माहितीपट, जाहिराती या सर्वांचेच चित्रीकरण बंद झाले. यामुळे तीन महिने एकही नवा चित्रपट थीएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही. बहुतेक सर्वच वाहिन्यांवर जुन्या मालिका दाखवण्यात येऊ लागल्या. त्याच त्या मालिका पाहून प्रेक्षकही कंटाळले. त्यामुळे मालिकांचे नवे भाग दाखवण्यासाठी चित्रीकरणास परवानगी देण्याचे प्रयत्न सुरू झाले. जून महिन्यात त्याला परवानगी मिळताच अनेक मालिकांच्या चित्रीकरणाचा पुन्हा श्रीगणेशा झाला. यामध्ये कोल्हापूर आघाडीवर राहिले. तुझ्यात जीव रंगला, जीव झाला येडापीसा, राजा राणीची ग जोडी या तीन मालिकांचा यामध्ये समावेश होता. रोज १३ ते १५ तास चित्रीकरण करत अधिकाधिक भाग तयार करण्यावर भर दिल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना नवे भाग पाहण्याची संधी मिळू लागली.

वाचा:

चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी मुंबईसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या कलाकार, तंत्रज्ञांना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात आले होते. सर्व नियम पाळत चित्रीकरण सुरू झाले. पण याच दरम्यान कोल्हापुरात करोना संसर्ग वाढला. कोल्हापूर सुरक्षित आहे म्हणून येथे चित्रीकरणाला प्राधान्य देण्यात आले होते. मात्र या महिन्यात करोना बाधितांचा आकडा तीन हजारावर पोहचल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले. करोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे सर्व व्यवहार पुन्हा ठप्प झाले. चित्रीकरण करण्यासही बंदी आल्याने निर्मात्यांसह सारेच चिंताग्रस्त झाले. अशावेळी कोल्हापूर चित्रनगरी त्यांच्या मदतीला धावली.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्व नियम पाळत चित्रनगरीत परवानगी देण्यात आली. त्यानुसार तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे चित्रीकरण करण्यात आले. त्यासाठी चित्रनगरीत राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था करण्यात आली. येथे काम करणाऱ्या ३० लोकांचा इतर कुणाशीही संपर्क येऊ नये याची काळजी घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले सर्व नियम पाळत चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामुळे लॉकडाऊन असतानाही तीन दिवस अधिकाधिक चित्रीकरण आवरण्यात आले.

वाचा:

कोल्हापुरात आता चित्रीकरणासाठी अतिशय चांगली संधी आहे. सर्व सुविधा उपलब्ध आहेत. लॉकडाऊन अचानक जाहीर झाल्याने चित्रीकरणात अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व नियम पाळून चित्रीकरणाला परवानगी दिली. कोल्हापूरकर अडचणीच्या काळात मदतीला धावून येतात हे आम्ही दाखवून दिले- संजय पाटील, व्यवस्थापक, चित्रनगरी

लॉकडाऊनचे नियम शिथील होताच कोल्हापुरात आणखी दोन नव्या मराठी मालिकांसह दोन हिंदी वेबसीरिजचे चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्याची सर्व तयारी झाली आहे. चित्रनगरीसह अन्य काही ठिकाणी हे चित्रीकरण करण्यात येणार आहे- आनंद काळे, महालक्ष्मी सिने सर्व्हीस

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here