Maharashtra politics | विधानसभेचे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप नेत्यांनी रान उठवले आहे. आतापर्यंत भाजपने अजित पवार यांच्याविरोधात अनेक आंदोलने केली आहेत. त्यामुळे गेला आठवडाभर हा वाद तापता राहिला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

हायलाइट्स:
- औरंगजेब क्रूर नव्हता, अशी नवीन माहिती आव्हाडांनी समोर आणली
- जितेंद्र आव्हाड यांनी इतिहासाला नवे वळण देण्याचे काम केले
- संजय राऊतांची खोचक टिप्पणी
या लेखात संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. औरंगजेब क्रूर नव्हता, असा साक्षात्कार राष्ट्रवादीच्या एका आमदारास झाला. त्याचवेळी औरंगजेब सन्माननीय आहेत, असे भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पटले. महाराष्ट्रातील धार्मिक गोंधळाचा हा नवा इतिहास. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन मारले, तो क्रुरकर्मा औरंगजेब काय साधी असामी होती? असेच बावनकुळेंना म्हणायचे आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इतिहासाला नवे वळण देण्याचे काम केले. औरंगजेब क्रूर नव्हता, अशी नवीन माहिती आव्हाडांनी समोर आणली. औरंगजेबाचे महात्म्य सांगताना श्री. आव्हाड यांनी सांगितले, विष्णूच्या मंदिरासमोर संभाजीराजांना अटक केली, पण औरंगजेबाने विष्णूचे मंदिर तोडले नाही. या एका पुराव्याच्या आधारे औरंगजेब क्रूर नसल्याचे आणि मानवतावादी असल्याचे प्रमाणपत्र आव्हाड यांनी दिले. बहुधा त्याचमुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाडा यांना धारेवर धरताना औरंगेजबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला असावा, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
शिवाजी महाराजांच्या अपमानावर गप्प बसणारा भाजप अजित पवारांविरोधात रान उठवतोय: संजय राऊत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचे प्रकरण आता मागे पडले असून भारतीय जनता पक्षाने वडिलांच्या अपमानावर उतारा म्हणून पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या अपमानाचे प्रकरण समोर आणले. शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजभवनात बसून आहेत व संभाजीराजांच्या अपमानाबद्दल अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने सुरू केली. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाची ही दशा आहे! शिवाजी महाराजांच्या अपमानाचे प्रकरण सगळ्यात जास्त गंभीर असतानाही भाजपने त्यावर आवाज उठवला नाही याची इतिहासात नोंद राहील.
धर्मवीर सिनेमा खरा एकनाथ शिंदेंवर होता, आनंद दिघेंवर नव्हे; संजय राऊतांचा टोला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मुंबईत आगमन झाले. राजभवनावर योगींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस गेले. त्या भेटीदरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुहास्यवदनाने उभे असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांशी महाराष्ट्रातील ‘पोलिटिकल कपल’ अत्यंत सलगीने वागताना टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांवर जनतेने पाहिले. प्रेम आंधळे असते, पण यांना सत्तेने आंधळे केले व त्या अंधारात शिवरायांचा मान-सन्मान हरवला, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.