अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात घरातून निघून जात लग्न करणाऱ्यांची मोठी आकडेवारी समोर आल्यानंतर याबाबत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. ज्या पद्धतीने नव्या पिढीतील सुशिक्षित मुलं आणि मुली हे आपल्या आई-वडिलांच्या मनाविरुद्ध पळून जाऊन लग्न करू लागली आहेत, ही चिंतेची गोष्ट आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पलायन करून विवाह करण्यावर निर्बंध आणण्याचा एखाद्या कायदा यावा, अशी सगळ्यांची मागणी असल्याचं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.

‘नगर जिल्ह्यामध्ये महिन्याला अशा प्रकारची जवळपास दीडशे प्रकरणे आढळून येतात आणि हा समाजाला एक फार मोठा धोका निर्माण झालेला आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. यातून समाजात त्यांच्या आई-वडिलांची प्रतिमा किंवा नातेवाईकांची प्रतिमा खराब होते, हे मला वाटतं फार दुर्दैवी आहे. अशा प्रकरणांमुळे सामाजिक तेढ निर्माण होईल आणि आई-वडिलांचा मुला- मुलींवरील आणि मुला-मुलींचा आई-वडिलांवरील विश्वास कमी होत जाईल आणि हे भविष्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे,’ अशी भावनाही सुजय विखे यांनी व्यक्त केली.

आव्हाडांकडून इतिहासाला नवे वळण, औरंगजेबाला मानवतावादी असल्याचे प्रमाणपत्र दिले; संजय राऊतांच्या कानपिचक्या

‘…तर मी राजकारणात आलो नसतो’

‘मला जनतेच्या प्रेमामुळे राजकारणात यावं लागलं, डॉक्टर या नात्याने मी माझा व्यवसाय चांगला करत होतो, मला आजही वाटतं मी राजकारणात नसताना समाजाला चांगलं दिशा देण्याचे काम करू शकतो. मात्र जनतेने दिलेली जबाबदारी पार पाडावी लागते आणि ती पार पाडत पडत आज प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा संदेश घेऊन पुढे जावं लागणार आहे आणि मी एक माध्यम म्हणून तो संदेश पुढे घेऊन जात आहे,’ असं खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलं.‌

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. अगदी हाणामारीची भाषा केली जात आहे. यावर बोलताना सुजय विखे म्हणाले की, ‘राजकारणाची पातळी घसरल चाललेली आहे, त्याच्यावर कुठेतरी निर्बंध प्रत्येक पक्षांनी केला पाहिजे. प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यांनी देखील जपून बोललं पाहिजे,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

50 COMMENTS

  1. mexican pharmaceuticals online [url=https://mexicanpharmacy.guru/#]mexican pharmaceuticals online[/url] mexican mail order pharmacies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here