कोल्हापूर: , , ठाणे, सोलापूर अशा रेडझोन भागातून चार महिन्यांत जिल्ह्यात आलेल्या तब्बल अडीच लाख लोकांमुळे कोल्हापूरचे आरोग्य धोक्यात आले आहे. या आगमनाला दोन महिन्यात मर्यादा घातल्या गेल्या पण नंतर ‘त्याला काय होतंय’ हा चुकीचा आत्मविश्वास वाढत गेल्याने जिल्ह्यातील बाधितांचा आकडा तीन हजारावर पोहचला. जिल्हा प्रवेशाला बंदी घातल्यानंतरही अत्यावश्यक कारण दाखवत येणारा लोंढा थांबत नसल्याने कडक करूनही रोज बाधितांचा आकडा दोनशेचा टप्पा पार करत आहे. रुग्णालयांची क्षमता संपल्यानेआ आता प्रशासनाची धावपळ उडाली आहे. ( )

वाचा:

कोल्हापुरातील काही लाखावर नागरिक नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुणे यासह राज्यातील विविध जिल्ह्यात व परराज्यात राहतात. त्यामध्ये केवळ मुंबईतच अडीच ते तीन लाख लोक आहेत. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर व करोना संसर्ग वाढत गेल्यानंतर यातील बहुसंख्य नागरिकांनी कोल्हापूरचा रस्ता धरला. त्याला काही प्रमाणात स्थानिकांनी विरोध केला. पण ते मूळचे कोल्हापूरकरच असल्याने त्यांना रोखणे अशक्य होते. यातून केवळ एप्रिल महिन्यात साधारणत: लाखापेक्षा अधिक लोक कोल्हापुरात आले. यामध्ये शाहूवाडी, आजरा, भुदरगड या तालुक्यातील नागरिक जास्त होते. हे सारे रेडझोन मधून आल्याने त्यांची तपासणी केली. यात पाचशेवर पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दरम्यान, कुठेही नोंद न करता गुपचूप कोल्हापूर गाठलेल्या अनेकांनी करोना संसर्ग वाढवला. यामुळे हा आकडा आठशे ते हजारावर गेला.

वाचा:

कोल्हापुरात येणाऱ्या लोकांवर प्रशासनाने वॉच ठेवण्यास सुरुवात केली. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची माहीम राबवली. १३ मे ते २२ जुलै या दरम्यान जिल्ह्यात एक लाख ३३ हजारावर नागरिक आले. यामध्ये मुंबई आणि पुणे या भागातील तीस हजारावर नागरिकांचा समावेश होता. या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात असल्याने करोना संसर्गावर काही प्रमाणात मर्यादा आल्या. पण या काळात विनाकारण ये जा करणाऱ्यांची संख्या वाढली. कोल्हापुरात बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे, याचा पुरावा देणारी आकडेवारी सर्वत्र पसरली. त्यामुळे कोल्हापूर सुरक्षित आहे, त्याला काय होतंय ही भावना वाढली. नेमकं याच भावनेमुळं नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनेकडं दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. त्याचा फटका बसला. केवळ आठ दिवसात रोज २०० ते ३०० रुग्ण वाढत गेल्याने करोना बाधितांचा आकडा आता तीन हजारावर पोहोचला आहे.

वाचा:

जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ८५ लोकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये दीड हजारावर लोक बरे होऊन घरी परतले असले तरी सध्या १८०० लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयाची क्षमता नाही. यामुळे सध्या प्रशासनाची तारांबळ उडत आहे. लॉकडाऊन अतिशय कडक केल्यानंतरही आकडा कमी होत नसल्याने अडचणींचा डोंगर उभा राहण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.

करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण त्याला काय होतंय या प्रवृत्तीमुळे त्याला रोखणे अशक्य होत आहे. नागरिकांच्या या चुकीच्या आत्मविश्वासामुळे गेल्या काही दिवसांत रोज आकडा वाढत आहे- प्रसाद संकपाळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

दोन महिन्यात कोल्हापुरात आलेले परजिल्ह्यातील नागरिक

मुंबई- १२०२०
मुंबई उपनगर- १६२२
ठाणे- १७५९०
पालघर- ५२८३
रायगड- ४३११
पुणे- १४८४६
सोलापूर- ६१७०
इतर भाग- १४४४

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here