मुंबई : महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान अभिजीत कटके (Abhijit Katke ) याने हिंदकेसरी (kesari) किताब पटकावलाय. हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेने खुल्या गटातून हा मान मिळालाय. अंतिम फेरीत अभिजीने हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव केलाय. भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या वतीनं हिंदकेसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिजीने पटकावलेला हिंदकेसरीचा किताब म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि तितकीच अभिमानाची बाब आहे.
अभिजीत कटके याच्या विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष साजरा केला जातोय. अभिजीत मुळचा पुण्याचा असल्याने पुण्यात देखील फटाके फोडून जल्लोष साजरा केला जातोय. भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा म्हणजे हिंद केसरी. या हिंद केसरी सामन्याचा अंतिम सामना आज खेळला गेला.
दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी तर एकवेळा महाराष्ट्र केसरी
अभिजीत याने या पूर्वी दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी तर एकवेळा महाराष्ट्र केसरी (Maharastra Kesari) किताब पटकावला आहे. त्यानंतर त्याने हिंद केसरीची मानाची गदा पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.
महत्वाच्या बातम्या