करोनाच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार त्यांनी ही माहिती दिली. राव म्हणाले, ‘जुलै महिन्याअखेरीस करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढणार आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ८०० खाटांची क्षमता असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये ६०० ऑक्सिजनयुक्त खाटा, २०० अतिदक्षता खाटा असणार आहेत. याबाबतची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. दोन दिवसांत या कामाची वर्कऑर्डर देण्यात येणार असून, १५ ऑगस्टपर्यंत हे केंद्र सुरू होऊ शकणार आहे.’ असे राव यांनी स्पष्ट केले.
‘शहरातील करोना केअर सेंटरमध्ये सुमारे चार हजार खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. खासगी रूग्णालयांपैकी इनलॅक्स बुधरानीमध्ये १०० खाटांवरून ३१० खाटा, रुबी हॉल क्लिनिकमध्ये १५० वरून ४०० खाटा, ससून रुग्णालयात २२० वरून ८७० खाटा वाढविण्यात आल्या आहेत. ससून रुग्णालयातील भाजलेल्या व्यक्तींवर उपचारासाठी असलेला विभाग, मानसोपचार विभाग तात्पुरते बंद करून त्या ठिकाणी करोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे ससूनमध्ये सुमारे ९७० खाटा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी किती अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे, त्याचा अहवाल ससून प्रशासनाकडून मागविण्यात आला आहे’ असे राव म्हणाले.
२० टक्के रुग्ण पुण्याबाहेरील
‘पुण्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे २० टक्के रुग्ण हे पुणे जिल्ह्याबाहेरील असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुणे शहरावर ताण येत आहे; तसेच मेडिकल प्रक्टिशनर असोसिएशनचे ६५० डॉक्टर हे सेवा देण्यास तयार आहेत’ अशी माहिती राव यांनी दिली.
गरजूंना खाटा उपलब्ध करून द्या
‘खासगी रुग्णालयांनी करोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर योग्य वैद्यकीय बील द्यावे; तसेच रुग्णालयातील उपलब्ध खाटा या गरजू रुग्णांना देण्याबाबत प्राधान्याने विचार करावा’ अशा सूचना राव यांनी दिल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात राव यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख रुग्णालयांचे व्यवस्थापक, संचालक आणि डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी राव यांनी या सूचना केल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times