Maharashtra Politics | मी आता ज्या उंचीवर आहे, त्या उंचीवर येणं साध्या लोकांना जमत नाही. पक्षाकडून विधान परिषद किंवा इतर ठिकाणी का संधी दिली जात नाही?, या प्रश्नावर उत्तर देणे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना टाळले. मला उमेदवारी नाही दिली त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा, एवढेच पंकजा मुंडे यांनी म्हटले.

 

Pankaja Munde Pritam Munde
पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे

हायलाइट्स:

  • माझ्याइतकं भाग्यवान कुणीही नाही
  • मोठं भाग्य म्हणजे माझा जन्म पंकजाताईच्या पाठीवर झाला
नाशिक: राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांना सध्या त्यांच्या पक्षात अपेक्षित मानमरातब मिळत नसला तरी त्यांची धाकटी बहीण आणि खासदार प्रीतम मुंडे यांना मात्र आपल्या बहिणीच्या कर्तृत्त्वाची आणि त्यागाची पुरेपूर जाणीव असल्याचे दिसून आले. नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलतान प्रीतम मुंडे यांनी आपल्या ज्येष्ठ भगिनी पंकजा मुंडे यांच्याविषयीची कृतज्ञता बोलून दाखवली. ‘सगळे घाव झेलायला ताई आणि मलाई खायला मी’, असे वक्तव्य त्यांनी या कार्यक्रमात केले.

आज ‘सबका साथ, सबका विकास’, हा भाजपचा नारा आहे. पण हा नारा ४० वर्षे ज्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात एक व्यक्ती जगली. ती व्यक्ती म्हणजे गोपीनाथ मुंडे. माझा त्यांच्या घरी जन्म झाला. त्यामुळे माझ्याइतकं भाग्यवान कुणीही नाही. त्यापेक्षा मोठं भाग्य म्हणजे माझा जन्म पंकजाताईच्या पाठीवर झाला. कारण सगळे घाव झेलायचा ताई आहे आणि त्याची सगळी मलाई खायला मी आहे, असे प्रीतम मुंडे यांनी म्हटले.

स्वाभिमानाचा एक्झिट केव्हाही बरा: पंकजा मुंडे

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याची चर्चा सातत्याने सुरु आहे. मध्यंतरी त्यांनी बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थितीत असलेल्या कार्यक्रमाला जाणे टाळले होते. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा औरंगाबादमध्ये आले असताना पंकजा मुंडे यांना त्यांच्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.
फडणवीस-बावनकुळेंच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंची दांडी; इन्स्टाग्रामवर टाकली कुत्र्याच्या वाढदिवसाची पोस्ट
या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी रविवारी वंजारी युवा सन्मान आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात केलेल्या आणखी एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजकीय क्षेत्रात स्वाभिमानाने जे काही मिळेल ते घ्यायचे. स्वाभिमान सोडून काही मिळणार असेल तर बाहेर पडणे केव्हाही चांगले. प्रत्येक किलोमीटरवर हायवेवर एक एक्झिट असतो. स्वाभिमानाचा एक्झिट केव्हाही बरा, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मनात नक्की काय सुरु आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पंकजा मुंडेंना पुन्हा वगळलं; जे.पी. नड्डांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही

कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी वाकणार नाही: पंकजा मुंडे

संयमातून हवे ते मिळेल आणि आपली परिस्थिती बदलेल, यावर विश्वास आहे. राजकारणात आतापर्यंत खूप काही मिळवले आणि मिळवायचे आहे. आणि ते आपण मिळवणारच. राजकारण आणि समाजात वावरताना बरीच कसरत करावी लागली. मात्र, तुम्ही जे बोलता तसेच वागत असाल तर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. याचा अनुभव सध्या आपण घेत आहोत. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी आपण कुठल्याही क्षणी वाकणार नाही. वडिलांचा हा बाणा आजही आपल्यात कायम आहे, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here