नवी दिल्लीः कोविड -१९ मुळे निर्माण झालेली देशातील स्थिती हाताळण्याबाबत सरकारला उच्च रेटिंग प्राप्त झाले आहे. मुद्द्यावर तीन चतुर्थांशपेक्षाही अधिक नागरिकांनी सरकारला उच्च रेटिंग दिले. आयएएनएस सी-व्होटर कोविड -१९ ट्रेकरकडून ही माहिती मिळालीय. ताज्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार हे संकट व्यवस्थितपणे हाताळत आहे, असं मत सर्वेक्षणात १,७२३ नागरिकांपैकी ७७.३ टक्के नागरिकांनी व्यक्त केलं आहे. तर १९.१ टक्के नागरिक मात्र याच्याशी सहमत नाहीत.

पंतप्रधानांना एप्रिल-जूनच्या तुलनेत कमी रेटिंग

गेल्या महिन्याच्या तुलनेत या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींचे रेटिंग कमी झाले आहे. आर्थिक संकटामध्ये लोकांच्या संयमाची सतत परीक्षा घेतली जात आहे. एप्रिल-जून महिन्यात या मुद्द्यावर रेटिंग ९० ते ८० दरम्यान होते. कोरोना संकटाला कित्येक महिने झाले आहेत. प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहे. यामुळे आपल्यालाही संसर्ग होऊ शकतो असं सुमारे ६० टक्के लोकांना वाटतंय. आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील इतरांना करोनाचा संसर्ग होऊ शकतो? असा प्रश्न सर्वेक्षणात विचारला गेला. यावर ५९.८ टक्के नागरिकांनी सहमती व्यक्त केली आहे. तर ३४.९ टक्के नागरिकांनी असहमती दर्शवली.

करोनाच्या संकटाने नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती नाही

कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशात कुठेही गोंधळाची स्थिती नाहीए. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक नागरिकांनी करोनाबाबत अति भीती निर्माण केली गेल्याचं मत व्यक्त केलं आहे. करोनाची भीती वाढून सांगितली गेली असं ४९.३ टक्के नागरिक म्हणाले. ही भीती अतिशयोक्तीपूर्ण आहे तर ४१.२ टक्के नागरिक याच्याशी असहमत आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या नव्या अनुभवामुळे नागरिक रेशन गोळा करण्यास अधिक जागरूक झाले आहेत. ५४.३ टक्के नागरिकांकडे तीन आठवड्यांहून अधिकचे रेशन आहे. म्हणाले की त्यांच्याकडे तीन आठवड्यांपेक्षा जास्त रेशन आहे. तर तीन महिन्यांपेक्षा कमी रेशन असल्याचं ४४.७ टक्के नागरिकांचं मत आहे.

केवळ ६.८ टक्के नागरिकांची कोरोनासी लढाई

आपले कुटुंब किंवा आजूबाजूच्या कोणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, असं ९१.४४ नागरिक म्हणाले. सर्वेक्षणानुसार केवळ ६.८ टक्के नागरिकांनाच करोनाचा सामना करावा लागला आहे. एवढेच नागरिक किंवा त्यांचे कुटुंबात किंवा त्यांच्या आसपासच्या इतरांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. यापैकी सुमारे १.४६ टक्के रुग्णांना आरोग्याशी संबंधित कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. तर १.७२ नागरिकांना आरोग्यासंबंधी समस्या निर्माण झाल्या होत्या. पण आता ते बरे झाले आहेत. कोविड पॉझिटिव्ह असल्याने फक्त २.११टक्के रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ०.४७ टक्के नागरिकांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

करोना विषयी जागरूकता वाढली
जेव्हा २४ मे रोजी पहिल्यांदा हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी सुमारे १४ टक्के नागरिक याबद्दल काहीही बोलले नाही. परंतु जुलैपर्यंत ही संख्या कमी झाली आहे. करोना व्हायरसबद्दल नागरिक अधिक जागरूक झाले आहेत, हे सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here