अमरावती : कितीही जनजागृती केली तरी महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. लहान चिमुरड्या मुलींपासून ते अगदी वयस्कर महिलाही सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा अमरावतीमध्ये समोर आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात एक भयंकर प्रकार समोर आला आहे.

आई मोठ्या बहिणीच्या प्रसूतीकरिता बाहेरगावी गेली असताना घरात १५ वर्षांची मुलगी तिच्या सावत्र वडिलांसोबत राहत होती. आई घरी नसल्याने या मुलीने घरची सगळी कामं सांभाळत आपल्या वडिलांची सेवा केली. मात्र, या नराधम पित्याने बापाच्या नात्याला काळीमा फासत भयंकर कृत्य केले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावत्र बापाने १५ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना वरूड तालुक्यात घडली. वरूड पोलिसांनी २८ वर्षीय आरोपीविरुद्ध बलात्कार व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.

मित्रावरच चाकू फिरवून आरोपी फरार, २४ वर्षीय तरुणाची मृत्यूची झुंज; बीडमध्ये खळबळ
मुलीची आई मोठ्या बहिणीच्या प्रसूतीसाठी गेली होती. यामुळे पीडिताही सावत्र बापासमवेत घरी एकटीच होती. घरात एकटीच असलेली मुलगी कामे आटपून हॉलमध्ये बसली असताना सावत्र बाप तिथे आला. तिला धमकावत त्याने अतिप्रसंग केला. इतकंच नाहीतर कुठेही याची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

आरोपीने एकदा-दोनदा नव्हे तर १ ते ६ जानेवारीपर्यंत वारंवार अतिप्रसंग केला. आई परत आल्यानंतर तिने ही बाब तिला सांगितली. अखेर तिने ७ जानेवारी रोजी सायंकाळी वरूड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करून घेत तातडीने सूत्रे हलवत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

विमानतळावर प्रवाशाचा चॉकलेट बॉक्स उघडताच पोलीस चक्रावले; प्रताप पाहून कस्टम विभागही हैराण

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here