Girish Mahajan on Shiv Sena Rebel: शिवसेनेत (Shiv Sena) बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणालाही कलाटणी मिळाली. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलेल्या बंडानंतर दोन गट तयार झाले. एक ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि दुसरा शिंदे गट (Shinde Group). एकनाथ शिंदे यांच्यासह 40 ते 50 आमदार यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं. भाजप (BJP) आणि शिंदे गट यांच्या युतीचं सरकार. अशातच ठाकरे गटाकडून तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिवसेनेतील बंडामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप वारंवार केला जात होता. अशातच आता याची कबुलीच भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं दिली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

शिवसेनेचे दोन गट पडण्यामागे भाजपचंच मिशन होतं. हे गुपित मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी जळगावातीव एका सभेत बोलताना सांगून टाकलं. महत्त्वाची बाब म्हणजे, या सभेला मंत्री गिरीश महाजनांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मंत्री गुलाबराव पाटीलही (Gulabrao Patil) उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचं महाधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेत फूट पाडण्याचा भाजपचाच डाव असल्याची कबुली दिली आहे.  

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले. या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र ऑपरेशन सुरू केलं. एकनाथजी पुढे निघाले. ते पुढे गेले आणि बघता बघता त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलंच. सारं जुळून आलं. घडून आलं, हे सांगत यामागे चामुंडा मातेचाही आशीर्वाद होताच.” 

“हे सर्व मिशन एवढं सोपं नव्हतं. शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोक बाहेर पडतात, उद्धव ठाकरे यांना कंटाळून ते बाहेर पडतात. सतरा अठरा लोक घेऊन बाहेर पडायचं आणि पन्नासपर्यंत मजल गाठायची, हे खूप अवघड होतं. मध्येच मिशन फेल झालं तर काय करायचं? असं वाटायचं. मात्र पुढारी कसे असतात, तुम्हाला माहिती आहे. आम्ही कसे असतो, तुम्हाला माहिती आहे.”, असं गिरीश महाजन म्हणाले. हे म्हणताच उपस्थितांमध्ये एकाच हशा पिकला. मात्र लोक आले आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभी राहिले,  त्यामुळे अनेकांचे आशीर्वाद, प्रार्थना या एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी होत्या. हे सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना शेरोशायरी ऐकवली.  

live reels News Reels

याच सभेत गिरीश महाजनांचा शायराना अंदाजही पाहायला मिळाला. “कदम कदम पे ऊरजो जबान देता है. हर बला से मुझको बचा लेता है… पता नहीं कीसकी दुवाओ फैज है मुजपर… डूबने लगता हु… तो दरिया उछाल देता है…” ही शायरी ऐकवत, अशीच लाट आली आणि एकनाथ शिंदे साहेबांना बाहेर घेऊन आली अन् ते थेट मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरच विराजमान झाले, असंही मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले. 

मंत्री गिरीश महाजन याची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

गेल्या अडीच वर्षांचा कारभार बघितला, तर मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरीसुद्धा चढली नाही. घरून काम करतो. कॉम्प्युटरवर काम करतो, असंच काम त्यानी केलं, असं म्हणत मंत्री गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांच्यासमोरच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. एकनाथ शिंदे यांना मी सांगतो किमान चार तास तरी झोपा, पाच तास तरी झोपा. मात्र ते तीन-तीन वाजेपर्यंत काम करतात, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रात्रंदिवस काम करत आहेत. महाराष्ट्रातले सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावत आहेत. सर्वसामान्य लोकांना छोट्या छोट्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत, असं म्हणत महाराष्ट्रातील जनतेला वाटतंय की, खऱ्या अर्थानं जाणता राजा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करता आहेत, असंही मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

CM Eknath Shinde on Gulabrao Patil: गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहोचले? महाजन, चव्हाणांचं नाव घेत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केलं उघड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here