जयपूरः राजस्थानमधील सत्तासंघर्ष रोज नवनीव घडामोडी घडत आहेत. राज्यातील सत्तासंघर्ष आता सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आहे. यादरम्यान, मुख्यमंत्री यांनी संध्याकाळी उशिरा राज्यपाल कलराज मिश्र यांची भेट घेतली. लवकरच विधानसभेचं अधिवेशन बोलावण्यात येईल आणि आपलं सरकार बहुमत सिद्ध करेल, असं गहलतो हे या भेटीनंतर म्हणाले. ‘लवकरच विधानसभेचे अधिवेशन होईल. आमच्याकडे बहुमत आहे. कॉंग्रेसचे सर्व आमदार एक झाले आहेत, असं गहलोत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

जे आमदार नाराज होऊन यांच्यासोबत गेलेत ते या अधिवेशनात उपस्थित राहतील. सचिन पायलट गटाचा उल्लेख त्यांनी टाळला. त्यांच्याशिवाय आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावर आपण सभागृहात जाऊ आणि विश्वासदर्शक ठराव जिंकू, असं गहलोत म्हणाले. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावासाठी तयारी करत असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री गेहलोत यांनी यावेळी दिले.

अमेरिकेतील एसएफएलला टेप पाठविण्यास तयार

यापूर्वी माध्यमांशी बोलताना राज्याच्या राजकारणामध्ये सुरू असलेल्या वादावर अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. ऑडिओ टेप प्रकरणात गहलोत म्हणाले की, टेप पूर्णपणे बरोबर आहे. या ऑडिओ टेपचे सत्य लोकांना माहित आहे. परंतु, यात भाजपला सत्य दिसत नसले तरी राजस्थान आणि दिल्लीच्या एसएफएल टीमऐवजी आम्ही अमेरिकेच्या एसएफएल टीमला पाठवण्यास तयार आहोत, जेणेकरून त्याची सत्यता स्पष्ट होईल.

अमेरिकेत टेप पाठवण्यासाठी तयार

राज्यातील ऑडिओ टेप वादावर गहलोत यांनी दावा केला. टेप पूर्ण खरी असल्याचं ते म्हणाले. या ऑडिओ टेपची सत्यता जनतेला कळली आहे. तरीही भाजपला यात खोटेपणा वाटत असेल तर राजस्थान आणि दिल्लीत एसएफएल टीम ऐवजी अमेरिकेतील एसएफएल टीमला टेप पाठवण्यासाठी आम्ही तयररा आहोत. यामुळे टेपची सत्यत समोर येईल, असं ते म्हणाले.

करोना संकटात सरकार पाडण्याचा प्रयत्न, जनता माफ करणार नाही

कोरोनाचे संकट देश आणि राज्यांसमोर आहे. करोना संकटाच्या काळात सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्यांना जनता माफ करणार नाही. आपण देशभरातील आकडेवारी पाहिली तर दुसर्‍या-तिसर्‍या सेकंदाला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. देशात एक भयानक साथीचा रोग आहे. तरीही भाजप देशातील राज्यांचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काय झाले ते आम्ही पाहिले आहे. पण करोनाच्या संकटात जनता त्रस्त आहे. यामुळे सरकार पाडणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असं गहलोत म्हणाले.

कॉंग्रेस कोर्टाचा आदर करते: गहलोत

कॉंग्रेस कोर्टाचा आदर करते. प्रत्येकाने कोर्टाचा आदर केला पाहिजे. कारण तेथे गरीबपासून ते श्रीमंताला न्याय मिळू शकतो. आम्ही कोर्टाचा सन्मान करतो आणि कोर्टाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत, असं मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here