Nashik News : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या शिवपुत्र संभाजी (Shivputra Sambhaji) नाटकाचा प्रयोग नाशिकमध्ये होणार असून त्याचा प्रोमो आज प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीने नेते छगन भुजबळ यांना नाटकाचं पहिलं तिकीट दिलंय. तसेच या तिकिटाचे पाच हजार रुपये छगन भुजबळांनी अमोल कोल्हे यांना दिले आहेत.

नाशिकमध्ये (Nashik) लवकरच शिवपुत्र संभाजी हे नाटक रंगणार असून भव्य सेटसह दोनशे कलाकारांचा लवाजमा व अमोल कोल्हे यांचा अभिनय नाशिककरांना अनुभवता येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली असून याच दरम्यान शिवपुत्र संभाजी नाटकाचे पहिले वहिले तिकीट हे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना दिले आहे. तसेच या तिकिटाचे पाच हजार रुपये छगन भुजबळांनी अमोल कोल्हे यांना दिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले व शिवपुत्र संभाजी महाराजांचा ज्वाजल्य इतिहास अनुभवण्यासाठी नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. असे महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित शिवपुत्र संभाजी हे महानाट्य लवकरच नाशिकमध्ये होणार असून याची तयारी सुरु झाली आहे. 

दरम्यान जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हे नाटक रंगणार असून या पार्श्वभूमीवर आज अमोल कोल्हे यांनी भुजबळ फार्म येथे भेट घेतली. या भेटीवेळी शिवपुत्र संभाजी नाटक तथा इतर विषयांवर चर्चा झाली. यावेळी अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही आता म्हणतायत  छत्रपती संभाजीनगरला नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद नामांतरण व्हावे ही राष्ट्रवादीचीही भूमिका आहे का? यावर भुजबळ म्हणाले की, आज ते (अमोल कोल्हे) खासदार म्हणून नाही, तर कलाकार म्हणून आले आहे. संभाजी महाराज यांचे सर्वांच्या हृदयात स्थान आहे. याला सर्वपक्षीय पाठिंबा निश्चितच असेल. निवडणुकीच्या वेळी ते आपलं मत मांडत असतात, मात्र कुणी जर चांगल्या कामासाठी बोलावलं तर पवार साहेब जातात. हे असंच राजकारण चाललं पाहिजे, एकमेकांना समजून घेणार. एखाद्याचा द्वेष करायचा, तेढ माजवायचा यापेक्षा हे चांगल आहे.

तसेच यावेळी भुजबळ यांनी राज ठाकरेंवर बोलणं टाळत गुलाबराव पाटील यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला कसे आले याबाबतचा किस्सा  जळगाव येथील कार्यक्रमात सांगितला. यावर भुजबळांनी एकाच ओळीत उत्तर दिले. ते म्हणाले, मला त्याबद्दल माहित नाही, पण गुलाबराव आजारी होते का? गुवाहाटीला अँबुलन्सने गेले ते अशा मिश्किलीत यांनी उत्तर दिले. दरम्यान अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी नाटकाचा प्रयोग नाशिकमध्ये होणार आहे. त्याचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीने नेते छगन भुजबळ यांना नाटकाचं पहिलं तिकीट दिलंय. या तिकिटाचे पाच हजार रुपये छगन भुजबळांनी अमोल कोल्हे यांना दिले आहेत.

live reels News Reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here