मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एका मुलानं आत्महत्या करून जीवन संपवलं. वडील ओरडल्यानं मुलाला वाईट वाटलं. त्यामुळे त्यानं स्वत:वर गोळी झाडून जीव दिला. ग्वाल्हेरच्या मुरार परिसरात ही घटना घडली.

वडील ओरडल्यानंतर अजय स्वत:च्या खोलीत आला. थोड्याच वेळात त्याच्या खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला. कुटुंबीयांनी अजयच्या खोलीच्या दिशेनं धाव घेतली. त्यावेळी त्यांना अजय रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. अजयला लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे कुटुंबाला धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अजयनं ज्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडली ती त्याच्याकडे कुठून आणि कशी आली याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
१८ वर्षांच्या तरुणानं कट्ट्यानं स्वत:वर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश दंडोतिया यांनी सांगितलं. वडील ओरडल्यानंतर तरुणानं स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती दंडोतिया यांनी दिली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.