Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) दिवसेंदिवस महिला सुरक्षितता गंभीर मुद्दा बनत चालला असून विनयभंगाच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. अशातच शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिक शहरात घडली आहे. यामुळे नाशिकच्या महिला सुरक्षेबाबत (Women Safety) नाशिक पोलीस काही पाऊल उचलणार कि नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

नाशिक शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीकडे (Crime) बघतिले तर यामध्ये रोजच एक विनयभंगाची (Molestation) घटना असते. त्यामुळे महिला अत्याचार हा नित्याचा झाला आहे. अशातच नाशिक शहरातील गजबजलेला परिसर असलेल्या सिडको परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिडको भागातील एका शाळेतील पिटी शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिक्षकांवर बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमन म्हणजेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरातील सिडको परिसरात असलेल्या त्रिमूर्ती चौक परिसरातील एका शाळेत दहा वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने गैरवर्तन केले आहे. शुक्रवारी दुपारी विद्यार्थिनी शाळेत असताना तिच्याशी जवळीक साधून मनात लज्जा उत्पन्न होईल असे असभ्य व अश्लील वर्तन केले. 

दरम्यान सिडको परिसरातील पाटीलनगर येथे असलेल्या पेठे विद्यालयात हा प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या विद्यालयात शारीरिक शिक्षण विषयाचा शिक्षक असलेला संशयित रवींद्र नाकील हा कार्यरत आहे. याने शाळेतील विद्यार्थिनींशी असभ्य शब्दांत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे शाळेत आणि परिसरात खळबळ उडाली असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी शिक्षकाचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शाळेतील शारीरिक शिक्षण या विषयाच्या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिडको परिसरातील संतापजनक घटनेनंतर नाशिक शहरासह परिसरात तीव्र अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या असून शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. संबंधित विद्यार्थिनीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत शिक्षकाने गैरवर्तन केले आहे. या घटनेनंतर तात्काळ पोलिसात धाव घेतली असून संशयित आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. समाजात अशा अनेक घटना वारंवार समोर येत असल्याने चिंतेचा विषय आहे. अशा पद्धतीने सर्रास मुलींची छेड काढणे, विनयभंग करणे हे प्रकार घडत असल्याने याकडे पोलिसांनी गांभीर्याने बघण्याची गरज आहे. 

live reels News Reels

 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here