नवी मुंबई: तळोजा परिसरात महिलांसोबत वारंवार किळसवाणे प्रकार घडलेले ऐकायला मिळतात. तसेच विभागातील इतर महिलांसोबत तर कधी लहान मुलींसोबत लिफ्टमध्ये छेडछाड केल्याच्या घटनादेखील अनेकवेळा घडलेल्या आहेत. महिलांविषयी विचित्र चाळे करणाऱ्या व्यक्तींना अनेक वेळा पोलिसांनी चोप दिला आहे. मात्र तळोजा परिसरातील या घटना कमी होण्याऐवजी वाढत चाललेल्या पाहायला मिळत आहेत.

तळोजामधील एका सुसज्ज सोसायटीच्या लिफ्टमध्ये पुन्हा एकदा महिलेसोबत घाणेरडे कृत्य केल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. तळोजा फेज एकमधील सेक्टर १४ प्लॉट क्रमांक १०४ मध्ये असलेल्या मार्बल आर्च को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे.
यूट्यूबवर २ महिने व्हिडीओ पाहिले; गुगलला प्रश्न विचारले; ‘अमिषा’ला बळी पडून पत्नीला संपवले
मार्बल आर्चच्या लिफ्टमधून एक महिला जात असताना एक तरुण तिच्या पाठोपाठ गेला. त्यावेळी लिफ्टमध्ये दोघांशिवाय कोणीच नव्हते. याच परिस्थितीचा फायदा घेऊन तरुणाने महिलेसमोर अश्लील कृत्य केले. तसेच दुसऱ्या लिफ्टमधून बाहेर येणाऱ्या महिलेच्या अंगाला हात लावून तिचा विनयभंग केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मार्बल आर्च सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला प्रकार ट्विट केला आहे. त्यात त्याने पोलिसांना टॅग केले आहे. महिलांसमोर अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे.
वडिलांना न सांगता बोलेरो घेऊन गेला, डेंट पडला; बाबा ओरडले, लेकाने टोकाचे पाऊल उचलले
तळोजामधील मोलकरणीसमोर घाणेरडे कृत्य करणाऱ्या तरुणाविरुद्ध महिलेने तळोजा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीला अटक केली आहे. तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी विषयी पोलीस अधिक तपास करत आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here