नाशिक : नाशिक जिल्ह्यातून एक अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांच्या खासगी प्रवासी बसला अपघात झाला आहे. या अपघातात बस थेट रस्त्यावरून उलटली आहे. बस उलटल्याने १३ भाविक जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर २ जण गंभीर असल्याची देखील माहिती आहे.

या खासगी बसमधील सर्व भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. बुलडाण्याहून ही बस त्र्यंबकेश्वर येथे जात होती. बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात झाला. बस रस्त्याच्याकडेला जाऊन उलटली. त्र्यंबकेश्वरजवळ झालेल्या भाविकांच्या बस अपघातात १३ जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसमधील सर्व जण हे बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी आहेत. रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. २ जण गंभीर असून त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप काही माहिती मिळालेली नाही.

कंपनीत काम करताना मनात खदखद होती, MBAतरुण नोकरी सोडून विकतोय मशरूम; कमवतोय बक्कळ पैसा

या बसमध्ये एकूण २९ प्रवासी होते. त्यापैकी १३ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती आहे. हे भाविक ब्रम्हगिरीवरून परतत असताना हा अपघात झाला. उतारावरून खाली येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व बस थेट नाल्यात पलटी होऊन समोरच्या झाडाला आदळली. दरम्यान, जखमी भाविकांमधील काही जणांची अवस्था गंभीर असल्याचे वृत्त आहे.

वनडे सामन्यापूर्वीच टीम इंडियासाठी वाईट बातमी, फिट झालेला जसप्रीत बुमराह ६ दिवसात संघाबाहेर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here