Nitin Deshmukh: उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस पाठवली आहे. 17 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एसीबीची नोटीस आलेले नितीन देशमुख ठाकरे गटाचे तिसरे आमदार आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना याआधी एसीबीनं नोटीस पाठवली होती. एकापाठोपाठ एका आमदाराला तपास यंत्रणा नोटीस पाठवत असल्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. 

नितीन देशमुख काय म्हणाले?
नोटीस आल्यानंतर नितीन देशमुख यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. 17 जानेवारी रोजी अमरावतीमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालमत्तेची माहिती देण्यास सांगितलं आहे. 17 तारखेला मी अमरावतीमधील कार्यालयात हजर राहणार आहे, असे नितीन देशमुख यांनी सांगितलं. 

आरोपाबाबात विचारलं असता ते म्हणाले की, मी चौकशीसाठी हजर राहणार आहे. पण तक्रार देणाऱ्याचं नोटीसमध्ये नाव नाही. एखाद्या आमदाराला नोटीस पाठवलाता कुणाची तक्रार आहे, त्याचा उल्लेख असायला हवा. पण नोटीसमध्ये तसा उल्लेख नाही. माझ्याकडे कोणती संपत्ती अवैध आहे, त्याचाही उल्लेख नाही. 17 तारखेला अमरावतीमध्ये रितसर पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल, असे देशमुख म्हणाले…. तक्रारकर्त्याच्या नाव न सांगण्याच्या अटीवर मला नोटीस पाठवण्यात आली आहे. तक्रारकर्त्याचं नाव समोर आल्यानंतर सत्य समोर येईल. त्याला कुणी तक्रार द्यायला लावलं, हे समजेल… 17 तारखेला पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल, असेही देशमुख म्हणाले. 

एसीबीच्या रडारावर असणारे ठाकरे गटाचे आमदार –

live reels News Reels

राजापूरचे आमदार राजन साळवी, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि आता बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस पाठवली आहे.  17 तारखेला नितीन देशमुख अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहेत. 

नोटीसमध्ये काय म्हटलेय?
उघड चौकशी संबधाने जबाब देणेकामी उपस्थित राहण्याबाबत नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस पाठवली आहे. आपल्याविरुद्ध उघड चौकशी क्रमांक ईऔ/46/अकोला/2022 अन्वये आपल्या संपत्तीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती परीक्षेत्रात अमरावती येथे सुरु आहे. 

सदर उघड चौकशीचे संबधाने आपले बयान नोंदविणे आवश्यक असल्याने बयान देणेकरिता आपण 17 जानेवारी सकाळी अकरा वाजता अपर पोलीस अधिक्षक कार्यालय लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती येथे उपस्थित राहवे… तसेच सोबत दिलेल्या मत्ता दायित्व फ़र्म क्रमांक एक ते साची संपूर्ण माहिती भरुन द्यावी..

आणखी वाचा:
Nitin Deshmukh Speech :गुवाहटीला पोहोचले कसे, पळून कसे आले, नितीन देशमुखांनी भाषणात सांगितली घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here