संतापाच्या भरात पाळीव कुत्र्याला संपवणाऱ्या मालकिणीचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. कुत्र्याचा मृतदेह फेकण्यासाठी महिला घरातून निघाली. मृतदेह टाकण्यासाठी ती तलावाजवळ गेली. मात्र मृतदेह फेकताना तिचा तोल गेला आणि पाण्यात बुडून मृत्यू झाला.

रुबी बराच वेळ घरी परतली नसल्यानं तिचा पती शोधासाठी घराबाहेर पडला. त्याला तलावात रुबीची चप्पल तरंगताना दिसली. त्यानं आसपासच्या लोकांकडे मदत मागितली. सगळ्यांनी महिलेचा शोध सुरू केला. काही वेळात तलावात महिलेचा मृतदेह सापडला. स्थानिकांनी मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
महिलेच्या पतीचा जबाब नोंदवून पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती लखनऊ पूर्व झोनचे एडीसीपी सय्यद अली अब्बास यांनी दिली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.