Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Jan 2023, 7:08 pm

Mumbai News : वरळीत असलेल्या अविघ्न हाऊसच्या इमारतीतील लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही इमारत तब्बल १९ मजल्यांची होती.

 

Mumbai Worli Avignha Building Elevator Collapsed
Mumbai Worli : वरळीत अविघ्न इमारतीची लिफ्ट कोसळली; दोन कामगारांचा मृत्यू

हायलाइट्स:

  • वरळीत अविघ्न हाऊसच्या इमारतीची लिफ्ट कोसळली
  • या घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे
मुंबई : वरळीत प्रेम नगर येथील अविघ्न हाऊस इमारतीतील लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत २ कामगारांचा मृत्यू झाला आहे. हे दोघं कामगार १५व्या मजल्यावर काच पुसत असताना ही लिफ्ट अचानक कोसळली. ही इमारत १९ मजल्यांची असून पोलीस आणि फायर ब्रिग्रेडचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. इमारतीच्या आवारात लिफ्ट कोसळ्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विक्रोळी येथे लिफ्ट कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज वरळीत ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ मजळी इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं होतं परंतु, लिफ्ट बसवण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी ही घटना घडली आहे. लिफ्टमध्ये आणखी काही लोक अडकले आहेत की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली असून पोलिसांनी घटनास्थली मदत कार्य सुरु केलं आहे.

‘बुमराह सराव करत असताना त्याला….’रोहित शर्माने सांगितले संघाबाहेर जाण्याचे कारण

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here