Nashik Shivsena : नाशिकमध्ये (Nashik) शिवसेना ठाकरे गट-शिंदे गट वाद विकोपाला गेला असून आता शिंदे गटाने शहरातील शिवसेना मध्यवर्ती (Shivsena Office) कार्यालयावर दावा केल्याचे समजते आहे. नुकत्याच शिंदे गटात सामील झालेल्या एका कार्यकर्त्याने वडिलांचे नावाचे अग्रीमेंट पत्रकार परिषदेत दाखवत ठाकरे गटाला आता घाम फोडला आहे. त्यामुळे आता नाशिकच्या राजकारणात काय उलथापालथ होतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट (Shinde Sena) आणि ठाकरे गटात जोरदार रणकंदन सुरु आहे. अशातच नुकताच नाशिक (Nashik) दौऱ्यावर येऊन गेलेल्या संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने आज पत्रकार परिषद घेत जोरदार हल्ला चढवला. यावेळी शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर आगपाखड केली. त्याचबरोबर नुकत्याच शिंदे गटात गेलेल्या रुपेश पालकर या शिवसैनिकाने थेट शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावर भविष्यात कब्जा होऊ शकतो अशी वलग्नाचं यावेळी केल्याचे दिसून आले. मात्र एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणे आमच्या रक्तात नसल्याचे शिंदे गट पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांचा नुकताच नाशिक दौरा झाला. त्यात त्यांनी पुन्हा एकदा शहरात येऊन शिंदे गटाला व नव्यानेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली. संजय राऊत नाशिकला येण्यापूर्वी ठाकरे गटातून शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झाली होती. त्यामुळे संजय राऊत त्यांनी नाशकात येताच शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल करत जहरी टीका केली होती. तर नुकत्याच शिंदे गटात प्रवेश केलेल्या रुपेश पालकर याने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावर दावा करत ‘शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात जे गेले त्यांना ओळखत नाही, मात्र माझ्या वडिलांच्या नावावर शिवसेना कार्यालय आहे, या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावर दावा करणार असे ते म्हणाले. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटात आता मोठे रणकंदन होण्याची शक्यता आहे. 

यावेळी माजी विरोधी पक्षनेते (मनपा) अजय बोरस्ते म्हणाले कि, आम्हाला कोणाला कब्जा सांगायची गरज नाही, यासाठी पेपर दाखवले की संजय राऊत यांना कार्यकर्तेच माहीत नाहीत, दोन दोन-चार बगल बच्चे सोडले, तर त्यांना पदाधिकाऱ्यांची ओळखच नाही. रुपेशचे वडील हे महानगर प्रमुख होते, त्या काळात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे एग्रीमेंट झाले आहे, आम्हाला कोणालाही कब्जा सांगायची गरज नाही, हे एग्रीमेंट एवढ्यासाठीच रुपेशने दाखवलं की आम्हाला पाचोळा पालापाचोळा म्हटलं जात आहे. आम्ही ठरवलं तर जिथून संजय राऊत बोललेत, त्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतो, मात्र असल्या लेव्हलला जर संजय राऊत जात असतील मात्र आम्ही जात जाणार नाही. असे प्रत्युत्तर अजय बोरस्ते यांनी दिले आहे. 

live reels News Reels

शिवसेना कार्यालय वडिलांच्या नावावर 
रुपेश पालकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते ठाकरे गटात शिवसेनेत होते. त्यानंतर आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिट्ठी देत शिंदे गटाची वाट धरली. आजच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, माझ्या वडिलांनी शिवसेनेसाठी खुप काही केलं आहे. आज शिवसेना कार्यालय सुद्धा वडिलांच्या नावावर आहे. संजय राऊतच्या कार्यालयातून बोलले, भविष्यात त्या कार्यालयावर आम्ही क्लेम करणार आहे. दरम्यान मी देखील गेल्या दहा वर्षांपासून काम करतो आहे, शिवसेनेमध्ये विविध पदांवर काम केलं आहे, मात्र संजय राऊत यांना हे देखील माहिती नाही की मी कोण आहे, ते अशा शब्दात रुपेश पालकर यांनी संताप व्यक्त केला. 

1 COMMENT

  1. I liked that the team ѡould be wіlling tߋ assist mе when I had issues withdrawing mʏ money.
    They at leаst ᴡant mе to Ьe abⅼе to access and manage mʏ money.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here